परवाना घ्या अन्‍यथा कारवाई; प्रशासनाचा फेरीवाल्‍यांना इशारा

NMC
NMCesakal
Updated on

नाशिक : शहरातील फेरीवाल्‍यांची बायोमॅट्रिक पद्धतीने नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत विक्री परवाना घ्यावा, अन्‍यथा कारवाई केली जाणार असल्‍याचे महापालिका प्रशासनातर्फे स्‍पष्ट केले आहे. आत्तापर्यंत पहिल्‍या टप्यांत नऊ हजार ६२९ आणि दुसऱ्या टप्प्यात दोन हजार ९२६, अशी बारा हजार ५४६ फेरीवाल्यांची नोंदणी केली आहे.

NMC
जुलैपासून डास आढळणाऱ्या घरांना दंड; साथ रोग प्रतिबंधाची तयारी

महापालिका विभागीय कार्यालयातून विक्री प्रमाणपत्र प्राप्त करून घेत कारवाई टाळण्याची सूचना केली आहे. सहा विभागीय कार्यालयांतर्गत अधिकाऱ्यांनी नियम व अटी- शर्तीवर आधारित फेरीवाल्यांचे क्षेत्र ठरविलेले आहे. विक्री प्रमाणपत्र वाटपाची कार्यवाही विभागीय स्तरावर होत आहे.

नेमून दिलेल्‍या क्षेत्राव्‍यतिरिक्‍त ना फेरीवाला क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्यावर अतिक्रमण विभागामार्फत कारवाई होणार आहे. त्यामुळे नेमून दिलेल्‍या क्षेत्रातच व्‍यवसाय करण्याच्‍या सूचना केल्‍या आहेत. पथ विक्री प्रमाणपत्र घेऊन व्यवसाय न करणाऱ्या नोंदणीकृत फेरीवाल्‍यांची नोंदणी तत्काळ रद्द केली जाणार असल्‍याची माहिती अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांनी दिली आहे. फेरीवाल्यांची बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी विक्री प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.

NMC
धोकादायक झाडांची टांगती तलवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.