Nashik ZP News: गुन्हा दाखल झाल्यावर आता देवरेंवरही कारवाई?

Nashik ZP News
Nashik ZP News esakal
Updated on

Nashik News: जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर लागलीच त्यांचा पदभार काढून घेण्यात आला होता.

त्यानंतर प्रभारी पदभार दिलेले उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्यावरही आता सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या प्रकरणी अजूनही त्यांचा पदभार काढण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Action will be taken or not against nashik zp Deputy charge post Education Officer news )

महात्मा गांधी विद्यामंदिर, आदिवासी सेवा समिती संस्थेत शासकीय नियम डावलून ४० शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करीत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे विश्वस्त मंडळ यांसह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर त्यांचा माध्यमिकचा पदभार काढून घेण्यात आला. त्यानंतर त्यांना रुजूही करून घेण्यात आलेले नाही.

त्यातच आता उदय देवरेंविरोधातही नियमबाह्य शिक्षक भरती करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

Nashik ZP News
Nashik ZP News: जि. प. मध्ये सर्वत्र शुकशुकाट... विभागप्रमुख तालुक्याला, कर्मचारी मोर्चात, जणू सुटीचाच माहोल

पाटील यांच्याप्रमाणेच त्यांच्यावर पदभार काढून घेण्याची कारवाई होणे अपेक्षित असताना दोन दिवस उलटूनही ती न झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली. प्रशासन त्यांना अभय देत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

"श्री. देवरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माहिती दिली आहे. गुन्ह्याची सर्व कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. सर्व माहिती हातात आल्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल." - रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Nashik ZP News
Government Employees Strike: ‘आरोग्या’चे 450 कर्मचारी संपात! अत्यावश्यक सेवा सुरळीत; NHRM, कंत्राटींनी बजावली सेवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.