नाशिक : विविध कलाकारांची मिमिक्री, बायको हरवल्याच्या नाटिकेद्वारे मांडलेला मनोरंजक प्रसंग, अशा अन् विविध मजेदार किश्श्यांद्वारे ‘नाटक कट्टा’च्या युवा कलाकारांनी चौफेर हास्य फुलविले. कलाकारांनी सादर केलेल्या आपल्या अभिनयाने उपस्थितांची वाहवा मिळवून आपल्या कलाकारीची छाप सोडली.
कलाकारांनी विनोदी प्रसंगी साकारताना सर्वांना पोट धरून हसविलेच, त्याचबरोबर रोजच्या जीवनातील ताणतणाव दूर सारण्यासही आपल्या कार्यक्रमातून हातभार लावला. (Actors of Natak Katta burst into laughter at Sakal Anand Mahotsav Nashik Latest Marathi News)
निमित्त होते, ‘सकाळ’ सातपूर कार्यालयात बुधवारी (ता. १२) झालेल्या ‘हॅप्पीनेस प्रॉग्रेम’ अंतर्गत हास्याचे फवारे कार्यक्रमाचे. या वेळी ‘सकाळ’चे वरिष्ठ व्यवस्थापक (एचआर) संजय पाटील यांनी ‘नाटक कट्टा’ कलाकारांचा परिचय करून देत स्वागत केले. ‘नाटक कट्ट्या’चे अभिजित गायकवाड, सचिन राठोड, अनिरुद्ध पाटील, अक्षय अशोक, लीना चौधरी, अनन्या शिंदे या कलाकारांनी छोटीशी विनोदी नाटिका उपस्थितांसमोर सादर केली. जॉनी, जॉनी यस पप्पा ही कविता एक शिक्षक वेगळ्या पद्धतीने सादर करायची ठरवतो.
त्यासाठी तो नाना पाटेकर, सुनील शेट्टी, शाहरुख खान अशा अभिनेत्याकडे जातो. तेव्हा हे अभिनेते आपल्या आवाजात ती कशी सादर करतात याची मिमिक्री अभिजित गायकवाड यांनी हुबेहूब सादर केली. वेगवेगळ्या प्रसिद्ध अभिनेत्यांच्या ‘सेम टू सेम’ आवाजाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाद्वारे कौतुकाची थाप दिली. यानंतर कलाकारांनी सादर केलेले छोट्याशा सुंदर विनोदी नाटकाद्वारे बायको हरविल्याचा प्रसंग सादर करून हास्याचे फवारे उडविले.
‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, उपवृत्तसंपादक प्रशांत कोतकर, सहाय्यक व्यवस्थापक दिलीप राजपूत, विकास जोशी, स्वप्नील जाधव, सुनील साळुंखे, सचिन कोंथुलकर, देवीदास गोडसे, भिका काळे, तुषार माघाडे, रमेश चौधरी, बळवंत बोरसे, रावसाहेब उगले, तुषार महाले, राजेश शिरसाट, मनोज खडके, संजय चव्हाण, प्रकाश मोरे, दिनेश वाणी, संदीप शेटे, हेमंत राऊत, गोपाल आहेर, प्रतीक जगताप, कमलेश जाधव, गोपाल बिरारे, कैलास हिरोडकर, गणेश जगदाळे, विजय इंगळे, निकिता भावसार, ललित पाटील, राजेंद्र शिंदे, संदीप गोसावी, मिलिंद सोनार, प्रसाद लवटे, पायल छाजेड, मनोहर शिंदे, शरद पाटील, लक्ष्मण चव्हाण, सोमनाथ मोकळ, लोटन सैंदाणे आदींसह ‘सकाळ’चे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.