Nashik Crime: अट्टल दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या! परराज्यात होते ‘मोस्ट वॉण्टेड’; मुंबई पोलिसांची कामगिरी

Crime
Crimeesakal
Updated on

Nashik Crime : महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मोस्ट वॉण्टेड असलेल्या दोघा अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या अखेर मुंबई पोलिसांनी आवळल्या आहेत. गेल्या सात वर्षांपासून हे दरोडेखोर पोलिसांना गुंगारा देत पसार होत होते.

अखेर मुंबई पोलिसांच्या युनिट नऊच्या पथकाने मोठ्या शिताफीने मालाड पूर्व परिसरातून जेरबंद केले आहे. (adamant smiles of robbers Abroad was Most Wanted Performance of Mumbai Police Nashik Crime)

गणेश पांडुरंग भोसले उर्फ महाराज उर्फ पप्पू (वय ४७, रा. चित्रकूट सोसायटी, नाशिक), संजू सुनका डोकरे उर्फ अमित उर्फ दद्दू उर्फ सुका (४३, रा. वडारीपाडा, नल्ला बाबूजी चाळ, मालाड पूर्व, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा अट्टल दरोडेखोरांची नावे आहेत.

गणेश भोसले हा उत्तर प्रदेशातील कोखराज पोलिस ठाण्यातील युपी गँगस्टर ॲक्ट या गुन्ह्यात मोस्ट वॉण्टेड आहे. तसचे, हैदराबाद येथील मुथ्थुट फायनान्सचे ४४ किलो सोन्याची जबरी चोरी केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime
Crime News : किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावर सोळा डंपरवर हवेली पोलीसांची कारवाई

महाराष्ट्रासह परराज्यात गणेश आणि संजू यांच्यावर दरोड्यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट नऊच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणानुसार दोघांना मालाड पूर्व भागातून सापळा रचून अटक केली.

मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त लखमी गौतम, अपर आयुक्त शशिकुमार मीना, उपायुक्त अमोघ गावकर, सहाय्यक आयुक्त महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दया नायक, सचिन पुराणिक, दीपक पवार, सहाय्यक निरीक्षक उत्कर्ष वझे, महेंद्र पाटील, नरेंद्र पालकर, संतोष काकडे, सुभाष शिंदे, सुनील म्हाळसंक, संजय भोसले, जितेंद्र शिंदे, भिकाजी खडपकर यांच्या पथकाने बजावली.

Crime
Kolhapur Crime : सापावर पाय पडल्याच्या भीतीनं इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू; तापानं फणफणतं होतं अंग, CPR मध्ये नेलं पण..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.