Nashik News : शहर पोलिस आयुक्तालयाच्या प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त पद रिक्त असल्याने या पदाचा अतिरिक्त भार विशेष शाखेचे सहायक आयुक्त अंबादास भुसारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
तसेच, आर्थिक गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांची पदोन्नतीने बदली झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.(Additional burden to Assistant Commissioner Bhusare nashik news)
या पदाचा भार पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्याकडे देण्यात आला आहे. नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या प्रशासन विभागाचे सहायक आयुक्तपदावरून सोमनाथ तांबे हे सेवानिवृत्त झाल्याने सदरील पद रिक्त होते. त्यामुळे विशेष शाखेचे सहायक आयुक्त अंबादास भुसारे यांच्याकडे प्रशासन विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांना गेल्या ऑक्टोबर महिन्यांत पदोन्नतीने नागरी हक्क संरक्षण दलाच्या उपविभागीय अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. परंतु, आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यभारातून त्यांना मुक्त करण्यात आले नव्हते. नुकतेच त्यांना कार्यमुक्त केल्यावर निरीक्षक आव्हाड यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेची सूत्रे देण्यात आली आहेत.
बदल्यांनंतरही त्याच जागी
आयुक्तालय हद्दीतील पोलिस ठाण्यांमधील उपनिरीक्षक ते सहायक निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या काही महिन्यांपूर्वी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त होत बदलीच्या जागी हजर होणे अपेक्षित होते.
परंतु, पोलिस ठाण्यांच्या कामकाजाच्या सोयीमुळे अद्याप संबंधित अधिकाऱ्यांना कार्यमुक्त न करण्यात आल्याने बदली होऊनही तिथेच कार्यरत आहेत. परिणामी पोलिस ठाण्यातील बंदोबस्त व ड्युटींचे नियोजन कोलमडल्याची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.