Nashik News : अंबडमधील अवैध व्यवहारांचा अपर महासंचालकांकडून कसून शोध

Additional Director General Praveen Salunkhe
Additional Director General Praveen Salunkheesakal
Updated on

नाशिक : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नाशिकमधील अंबड पोलिस ठाण्यातील अवैध धंद्यांसह आर्थिक व्यवहारांचा मुद्दा पोचल्याने, त्यासंदर्भातील चौकशीसाठी आलेल्या अपर पोलिस महासंचालकांकडून कसून तपास सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून अपर पोलिस महासंचालक अंबड पोलिस ठाण्यात तळ ठोकून असून, अंबड हद्दीतील अवैध धंदे, गुन्ह्यांच्या नोंदी आणि त्यासंदर्भातील तक्रारीची माहिती घेत आहेत.

दरम्यान, काही महत्त्वाच्या बैठकीसाठी मुंबईला परतले असून, ते पुन्हा येणार आहेत. दरम्यान, अंबडचे तत्कालीन पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Additional Director General thoroughly investigates illegal transactions in Ambad Nashik News)

अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके हे बुधवारी (ता. १८) नाशिकमध्ये दाखल झाले होते. ते नाशिकमध्ये दाखल होण्याच्या काही तासांपूर्वीच अंबड पोलिस ठाण्यातून पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांची पोलिस नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली होती.

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी, अवैध धंदे, आर्थिक अवैध व्यवहार आणि त्यांच्याविरोधातील तक्रारी याबाबत नुकत्याच पार पडलेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार नीतेश राणे यांनी लक्षवेधी मांडली होती.

त्याची गंभीर दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि अपर पोलिस महासंचालकांमार्फत गोपनीय चौकशीचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसारच अपर पोलिस महासंचालक साळुंके हे गेल्या चारदिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Additional Director General Praveen Salunkhe
Cyber Crime | बनावट मेसेजना बळी पडू नका, सायबर भामट्यांपासून सावध राहा : विजय सिंघल

अंबड पोलिस ठाण्यातील अवैध धंद्यांच्या गुन्ह्यांच्या नोंदी, अवैध धंद्यांविरोधातील तक्रारी, अवैधरीत्या आर्थिक व्यवहार यासंदर्भातील कसून तपास ते करीत आहेत. या चौकशीचा गोपनीय अहवाल ते शासनाला सादर करणार आहेत.

त्या अहवालानुसारच तत्कालीन पोलिस निरीक्षक देशमुख यांच्यावर कोणती कारवाई होते, याकडे आयुक्तालयाचे लक्ष लागून आहे. त्याचप्रमाणे, पोलिस कर्मचारी प्रशांत नागरे यांच्याबाबतही तक्रारी असून, त्यासंदर्भातही तपास केला जात आहे. त्यामुळे देशमुख व नागरे यांच्यासमोरील अडचणी येत्या काळात वाढण्याचीच शक्यता बोलली जात आहे.

Additional Director General Praveen Salunkhe
Nandurbar Crime News: 4 घरांत धाडसी चोरी; नायब तहसीलदारांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने लंपास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()