जुने नाशिक : स्वीडनमध्ये कुराण शरीफ जाळण्यात आले. तर, मुंबई येथील मोर्चात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केले. या दोन्ही घटनेमुळे मुस्लिम बांधवांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे शुक्रवारी (ता. ३) विविध मशीद, दर्गा परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (Additional security in old Nashik by police due to Sweden incident Nashik News)
पोलिसांनी शहर-ए-खतीब हिसामुद्दीन खतीब यांचे नेतृत्वाखाली मुस्लिम बांधव आणि मौलवींची बैठक घेऊन शांततेच्या मार्गाने त्यांच्या भावना व्यक्त करण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यानिमित्ताने शहरातील शुक्रवारचे औचित्य साधत सर्व मशिदीमध्ये एकाच वेळेस कुराण शरीफचे महत्त्व आणि पावित्र्य याबाबत बयान (धार्मिक प्रवचन) करण्यात आले.तसेच दोन्ही घटनेचा शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त केला.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
समाजकंटकांवर कारवाई करत अशा घटनांना आळा घालावा. अशी मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांना देण्यात आले.
या वेळी झाकिर हाजी, अस्लम खान, फय्याज बरकाती, समीर कोकणी, मौलवी महमूद आलम, मौलाना जाफर, शहानवाज कोकणी, मौलाना अफजल, मौलाना जुनैद दालम आदी उपस्थित होते. पोलिसांनी मात्र खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवार (ता.३) दिवसभर सर्व मशीद आणि दर्गा परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात होता. जुने नाशिक परिसरास छावणीचे स्वरूप आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.