Adgaon Bus Fire Accident : ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी

Bus Fire Accident News
Bus Fire Accident News esakal
Updated on

नाशिक : यवतमाळ येथून नाशिकच्या दिशेने निघालेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्स स्लीपर कोच बसला शनिवारी (ता.८) पहाटे नाशिक - औरंगाबाद रोडवर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये १२ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान, स्लिपर कोच ट्रॅव्हल्स बसला प्रत्यक्षात फक्त ३० प्रवाशांची परवानगी असताना, या बसमधून क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे ५३ प्रवासी प्रवास करीत होते. (Adgaon Bus Fire Accident Passengers more than capacity in travels case filed against both drivers nashik Latest Marathi News)

Bus Fire Accident News
Nashik Accident : कंडक्टर प्रवाशांना उठवायला मागे वळला अन्...; कंपनीचं स्पष्टीकरण

चिंतामणी ट्रॅव्हल्स कंपनीची यवतमाळ-मुंबई स्लिपर कोच बस यवतमाळमधून २७ प्रवासी घेऊन शुक्रवारी (ता.७) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मार्गस्थ झाली होती. यवतमाळ ते नाशिक दरम्यान मात्र बसमध्ये तब्बल ५३ प्रवासी प्रवास करीत असल्याचे समोर आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. यातील काही प्रवासी हे वाशीम, जालनातून बसमध्ये बसले होते.

प्रवास करणाऱ्या जखमी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार काही प्रवाशांना तर बसमध्ये बसण्यासाठीही जागा नव्हती. तरीही त्यांना बसमध्ये बसविण्यात आलेले होते. बसमध्ये आसनव्यवस्थेच्या दोन रांगामध्ये असलेल्या जाण्या- येण्याच्या जागेवर काही प्रवासी हे प्रवासादरम्यान झोपलेले होते. अपघाताची धडक बसताच स्लिपर बर्थवरील प्रवासी थेट खाली झोपलेल्या प्रवाशांच्याच अंगावर कोसळले.

Bus Fire Accident News
Nashik Bus Fire: ''जाग आली अन् बघतो तर..."; बसमधील छोट्या आर्यनचा थरारक अनुभव

बसच्या वातानुकूलित सिलिंडरचाही स्फोट

ट्रॅव्हल्स बस वातानुकूलित असल्याने त्यासाठी सिलिंडरची व्यवस्था असते. सदरच्या अपघातानंतर काही वेळात या वातानुकूलित यंत्रणेसाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरचाही स्फोट झाला.

गुन्हा दाखल

आडगाव पोलिसात चिंतामणी ट्रॅव्हल्स बस आणि आयशर ट्रक चालक या दोघांविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आडगाव पोलिस फिर्यादी आहेत. ट्रॅव्हल्स चालकाचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले तर ट्रकचालक अपघातानंतर पसार झाला आहे. सदरील अपघाताचा तपास आडगाव पोलिस करीत आहेत.

Bus Fire Accident News
Nashik Accident : अनेकांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग; तातडीने दिले आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.