Adhik Maas 2023 : अधिक मासानिमित्त लाडक्या लेक-जावयाच्या कपडे खरेदीसाठी सिलाई वर्ल्डला भेट द्यायलाच हवी. कारण आतापर्यंत कोणीच दिले नसेल, असे ‘ओपन रेट चॅलेंज’ सिलाई वर्ल्डद्वारे देण्यात आले आहे.
म्हणजेच गारमेंट्स शोरूम ज्या भावात कपड्यांची खरेदी करतात, तेच भाव आता सिलाई वर्ल्ड जगजाहीर करीत आहे. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांचा विशेषतः महिलावर्गाचा खूपच फायदा होईल.
कारण सिल्क साड्या व लेडीज कुर्ती ज्या किमतीत इतर कुठेही मिळणे शक्य नाही, त्या आता सिलाई वर्ल्डमध्ये महिलांना घेता येणार आहे. (adhik maas 2023 cilai World shop Open Rate Challenge for Shopping nashik news)
यासाठीच सिलाई वर्ल्डने खास ‘छप्पर फाडके’ ऑफर आणलेली आहे. यात सिलाई वर्ल्डने उत्पादकांकडून ज्या भावात खरेदी केली, त्याच्यावर फक्त १० टक्के रक्कम अधिक देऊन महिलांना ही खरेदी करता येईल. उदाहरणार्थ- बाजारात आठ हजार ५०० किमतीत विकली जाणारी प्युअर सिल्क साडी खरेदीच्या १० टक्के अधिक रक्कम देऊन फक्त तीन हजार ५९६ रुपयांत मिळणार आहे.
अशीच ऑफर ब्रोकेड सिल्क, टसर सिल्क, वल्कलम् या साड्यांमध्ये मिळणार असून, या सिल्कच्या महागड्या साड्या तुम्हाला फक्त ८०० रुपयांपासून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच घागरा, कांजीवरम, पैठणी, डिझायनर साड्यांनाही ही ऑफर देण्यात आलेली आहे. कुर्ती सेटवरही १० टक्के अधिकची ऑफर लागू असून, एम्ब्रॉयडरी कुर्ती सेट, प्रिंटेड कुर्ती सेट, कुर्ती, दुपट्टा सेट तुम्हाला २०० ते ८८० रुपयांच्या किमतीच्या रेंजमध्ये खरेदी करता येणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
एवढेच नव्हे, तर ड्रेसेस व गाऊनवरही अशीच ऑफर असल्याने महिलावर्गाला खऱ्या अर्थाने ‘छप्पर फाडके’ खरेदी करता येईल. तसेच, लाडक्या जावयाला वाण देण्यासाठी दोन खरेदी करा व दोन मोफत मिळवा अशी ऑफरही देण्यात आलेली आहे.
या ‘ओपन रेट चँलेज’बद्दल सांगताना सिलाई वर्ल्डचे संचालक सागर गुजर यांनी सांगितले, की महाराष्ट्रातील महिलांना अधिक स्वस्तात हे कपडे मिळावे, या उद्देशातूनच आम्ही ही संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया राबवत आहोत.
त्यामुळे अधिक मास तसेच येणाऱ्या सणासुदीच्या काळात ‘छप्पर फाडके’ खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी सिलाई वर्ल्डच्या शोरूमला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन सिलाई वर्ल्डद्वारे करण्यात आले आहे. ही ऑफर महाराष्ट्रातील सिलाई वर्ल्डच्या सर्व शोरूममध्ये सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.