Adhik Maas 2023: देव कुटुंबीयांकडून 18 जणांना वाणाचे दान!

Dev family donating varieties to 18 couples at once
Dev family donating varieties to 18 couples at onceesakal
Updated on

Adhik Maas 2023 : अधिक मासात जावई, भाचे यांना वाण देण्याची धूम सध्या सुरु आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात वाण देवून पुण्य मिळविण्याचा प्रयत्न हजारो कुटुंबीय करीत आहेत.

येथील देव कुटुंबीयांनी जावई, भाचे जावई, ब्राह्मण अशा अठरा जणांना एकाच वेळी वाण दिले. एवढ्या मोठ्या संख्येने वाण देण्याची ही पहिलीच घटना आहे.

कुटुंबप्रमुख मंगलाबाई व निंबा देव या दाम्पत्याने हा अनोखा उपक्रम राबवत आपली इच्छापूर्ती केली. (Adhik Maas 2023 Donation of seed to 18 people from Dev family nashik)

अधिक मासानिमित्त जावई, भाचे यांना वाण देण्याची जुनी प्रथा आजही जोपासली जात आहे. देव कुटुंबीयांनी नऊ भाच्या, सात भाचे, एक मुलगी असे सतरा नातलग व पुरोहित अशा एकूण अठरा जणांना वाण दान दिले.

सटाणा रोडवरील संस्कार हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. वस्त्र, सुवर्ण, ताम्र, दीप, अनारसे, मोदक, काजू, बदाम, मनुका आदी वस्तू दान करण्यात आल्या. देव कुटुंबीयांची परिस्थिती अतिशय सामान्य होती.

अतुल, महेश, अविनाश व मनोज देव या चौघा भावंडांनी वडिलांच्या मेहनतीला साथ देत व्यवसायातून उभारी घेतली. परिस्थिती सुधारल्याने सर्वांना एकत्र आणत वाण दानाची वडिलांची इच्छा त्यांनी पूर्ण केली. वाण घेण्यासाठी भाचे, भाच्या, जावई आदी नातेवाईक चाळीसगाव, कन्नड, ठाणे, धुळे, कळवण, नाशिक, सटाणा, पुणे, रांजणगाव आदी ठिकाणाहून आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dev family donating varieties to 18 couples at once
Adhik Maas 2023: अधिक मासात उजळली ‘कांस्य’कला! रावेरची दुर्मिळ ओळख जपणारी शेवटची पिढी

प्रशांत चंद्रात्रे यांनी पौराहित्य केले. वाण दानानिमित्त देव कुटुंबीयांचे इतर नातेवाईक देखील आल्याने कार्यक्रमाला स्नेहमेळ्याचे स्वरूप आले होते. शहर व परिसरात या उपक्रमाची चर्चा आहे.

"अधिकमास श्रीपुरूषोत्तम मासाने ओळखला जातो. महाविष्णुंना प्रिय असणारा अधिकमास आहे. जावई, भाचे, गुरू, सद्गुरू, ब्राह्मण यांना वाण देतात. ३३ देवतांच्या प्रित्यर्थ ३३ अनारसे यांचे दान दिले जाते. वैदृती, व्यतीपात, द्वादशी, पौर्णिमा, अष्टमी या पुण्यतिथीवर दान केले जाते. मोदक, बत्तासे, पांढरे तीळ, वस्त्र, दीप आदी दान केले जाते. दर तीन वर्षांनी अधिकमास येतो. या मासात कोणतेही कामनिक यज्ञ, याग न होता दानाचे विशेष पुण्य फळ मिळते."

- प्रशांत चंद्रात्रे, पुरोहित, मालेगाव

Dev family donating varieties to 18 couples at once
Adhik Maas 2023 : अधिक मासाच्या अधिक खरेदीसाठी सिलाई वर्ल्डचा ‘ओपन रेट चॅलेंज’!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.