Adhik Maas 2023 : महिला पुरोहितांकडून महारुद्र स्‍वाहाकार पूजन; अधिक मासातील सलग 3 वर्षांपासूनचा उपक्रम

Maharudra Swahakar Poojan
Maharudra Swahakar Poojan esakal
Updated on

Adhik Maas 2023 : शहरातील व बाहेरगावी असलेल्‍या महिला पुरोहिता अशा १५० महिलांकडून अधिकात श्रावण आल्‍याने महारुद्र स्वाहाकार पूजन रामतीर्थावरील यजुर्वेद मंगल कार्यालयात सोमवारी (ता. २४) व मंगळवारी (ता. २५) करण्यात आले.

मंगळवारी महिला पुरोहितांनी पारंपरिक वेशात हवन केले. तसेच, सामाजिक दातृत्‍व म्‍हणून शुन्यातून विश्‍व निर्माण करणाऱ्या अंजली केळकर यांचा सत्‍कार पुरोहिता विद्याताई दुगल यांनी केला. सलग तीन वर्षांपासून महिला पुरोहितांकडून उपक्रम राबविला जात आहे. (adhik maas 2023 Maharudra Swahakar Puja by Women Priests nashik news)

विद्याताई दुगल यांनी सांगितले, की प्रामुख्याने विनायक साने गुरुजींच्या नेतृत्‍वाखाली आम्‍ही सर्व जणी अधिकात उपक्रम करीत असतो. साने गुरुजी नेहमीच आम्‍हा महिला पुरोहितांना प्रोत्‍साहन देत असतात. एप्रिलपासून आजच्या कार्यक्रमासाठी तयारी करीत होतो.

टेक्‍नोसेव्हीमुळे आम्‍ही एकमेकींच्या खूप जवळ आलो आहोत. आम्‍ही सर्व जणी गुगल मीटद्वारे रुद्रावर्तनाचे पठण एप्रिलपासून करीत आहोत. आज आम्‍ही सर्व महिलांनी पारंपरिक वेश नऊवारी साडीत हवनाचे पूजन केले.

११२ महिला पुरोहिता व १३ गुरुजी मिळून रुद्रावर्तने

रुद्राची ११ आवर्तने म्‍हणजे एकादशनी. १२१ आवर्तने म्‍हणजे लघुरुद्र व एक हजार ३३१ आवर्तने म्‍हणजेच महारुद्र. यंदाच्या अधिकात ११२ महिला पुरोहिता व १३ गुरुजी मिळून रुद्र आवर्तनाचे पठण केले. महिला पुरोहिता व गुरुजी यांनी मंगळवारी स्‍वाहाकारात बेल फळ वाहून आहुती पूजन केले. पूर्णाहुती करून पूजनाची सांगता करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Maharudra Swahakar Poojan
Adhik Maas 2023 : निर्णयसागरचा अधिक श्रावण, टिळक पंचांगाचा श्रावण.. दोघांमध्ये नेमका फरक काय ?

महिला पुरोहितांकडून गुरुजी तसेच पाठशाळेतील विद्यार्थी यांना ताट, अनारसे, वस्‍तू व दीपदान करण्यात आले. तसेच, साने गुरुजींचा सत्‍कार महिला पुरोहितांकडून करण्यात आला. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्‍ल, भानुदास शौचे, नगरसेवक विजय साने या मान्यवरांचा या वेळी साने गुरुजींच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्यात आला. रेवती पारख यांनी सूत्रसंचालन केले.

"गायीचे तुप, समीधा यांचा हवनात समावेश असल्‍याने सभोतालचे वातावरण शुद्ध होण्यास मदत होते. तसेच, मंत्रध्वनीमुळे वातावरण प्रसन्नदायी होत असते. महारुद्र स्‍वाहाकार सुख, शांती, समाधान, जगाच्या कल्‍याणासाठी विश्‍वाचे अतिवृष्‍टी, अवर्षण यापासून संरक्षण व धनधान्य विपुलता यासाठी करण्यात आला आहे." - विद्याताई दुगल, महिला पुरोहिता, इंदिरानगर

"पूर्वापार काळापासून महिला या प्रत्‍येक क्षेत्रात अव्वल आहेत. पुरातन काळी महान विदुषी होऊन गेल्या. आधुनिक काळातील या महिला पुरोहिता तसेच यांचा असलेला उत्‍साह यामुळे त्‍यांना मार्गदर्शन करताना माझाही आनंद व उत्‍साह वाढतो. दोन अधिक मास व यंदाचा तिसरा अधिक असा हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे." - विनायक साने गुरुजी, पंचवटी

Maharudra Swahakar Poojan
Adhik Maas 2023 : जावई, गायीला वाण, मातेचे पूजन अन् 33 मेहूण भोजन; जाणून घ्या अधिक मासातील दानाचे महत्त्व!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.