Adhik Maas 2023: वाण देण्यासाठी फुलले रामतीर्थ! विविध मंदिरामध्ये महिलांची गर्दी

अधिक मासातील दानाचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी रामतीर्थासह पंचवटीतील विविध मंदिरांत महिलांची गर्दी होत आहे.
Women devotees offering vaan on Friday as more mass is going on
Women devotees offering vaan on Friday as more mass is going onesakal
Updated on

Adhik Maas 2023 : अधिक श्रावणमास संपण्यास अद्याप पंधरा दिवसांचा अवधी आहे. परंतु, अधिक मासातील दानाचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी रामतीर्थासह पंचवटीतील विविध मंदिरांत महिलांची गर्दी होत आहे.

प्रत्येक धर्मात दानाचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. हिंदूधर्मियांत तर गोदा स्नानापासून कन्यादानापर्यंतच्या दानाचे महत्त्व आहे.

गरजवंताला नियमित दानासह ग्रहपिडेपासून मुक्तीसाठीही दानाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. (Adhik Maas 2023 Ram Teertha bloomed to give vaan Crowd of women in various temples nashik)

अधिक श्रावण मास सुरू होऊन पंधरा दिवस उलटले असून, गोदामातेसह विविध मंदिरांत दान देण्यासाठी महिलांची मोठी गर्दी उसळत आहे. पाच किंवा अकरा बत्ताशे, दिवा, फुले असलेले हे वाण बाजारात वीस रुपयांपासून तीस रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

प्रथम देवाला वाण दिल्यावर जावयास वाण दिले जाते. यात कपड्यांपासून तांब्या पितळेची भांडी, बत्ताशे किंवा अनारसे, रोख रक्कम जावयास वाण दिले जाते. याशिवाय पुरणपोळीचे सुग्रास भोजनही दिले जाते.

जावयाचे पाय धुण्याचीही प्रथा अद्यापही टिकून आहे. अधिक मासात व्रत वैकल्याला अधिक महत्त्व असते. गोदावरीला वाण देण्याची प्राचीन परंपरा आहे. त्यानुसार रामतीर्थावर गोदामातेला दान देण्यासाठी सकाळ, सायंकाळ महिलांची गर्दी होते.

रामतीर्थात स्नान किंवा हातपाय धुतल्यावर प्रथम गोदामातेला वाण दिले जाते, त्यानंतर भाविकांची देवाला दान देण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. कपालेश्‍वर महादेव, काळाराम, मुरलीधर मंदिर, विठ्ठल मंदिर आदी ठिकाणी वाण देण्यासाठी गर्दी होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Women devotees offering vaan on Friday as more mass is going on
Adhik Maas 2023 : महिला पुरोहितांकडून महारुद्र स्‍वाहाकार पूजन; अधिक मासातील सलग 3 वर्षांपासूनचा उपक्रम

लाखो रुपयांची उलाढाल

वाण देण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या आकारातील आकर्षक पदके विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. याशिवाय तांब्याची भांडी दान देण्याचीही पद्धत आहे. या दानाच्या खरेदीसाठी भांडी बाजारात सध्या तेजीचे वातावरण आहे.

अधिक मासामुळे सध्या कापडासह तयार कपड्याची बाजारपेठही तेजीत असून अधिक मासामुळे धंद्यात वीस ते तीस टक्के तेजीचे वातावरण असल्याचे जयहिंद क्लॉथ स्टोअर्सचे संचालक धीरज मनवानी यांनी सांगितले.

अनेकांना रोजगार

अधिक मासात सप्तधान्यांच्या दानालाही महत्त्व आहे. त्यामुळे अनेकांना तात्पुरता को होईना रोजगार उपलब्ध झाला आहे. छोट्या पिशव्यांत ठेवलेले असे सप्तधान्य बाजारात सत्तर रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

याशिवाय द्रोणात ठेवलेला दिवा, फुले व पाच किंवा अकरा बत्ताशे मोठ्या प्रमाणावर विक्रीस असून ते वीस ते तीस रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. याद्वारे कोरोनात रोजगार गमावलेल्या अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

Women devotees offering vaan on Friday as more mass is going on
Adhik Maas 2023 : जावईबापूंसाठी अधिकमासाचा खास बेत करायचाय? हे घ्या स्पेशल ऑप्शन्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.