Adhik Maas 2023 : अधिक मासात लेक-जावयाला यशायोग्य पाहुणचार करण्याची परंपरा आहे. चांदीचे ताट, ताह्मण, निरांजन, गाय-वासरूची प्रतिकृती, दागिना देण्याची प्रथा आजही कायम आहे.
त्या पार्श्वभूमीवर शहरातील सराफ बाजारात महिन्याभरात कोटींची उलाढाल झालेली आहे. (Adhik Maas 2023 turnover of crores in month in bullion market Lake in law variety in more fish nashik)
दर तीन वर्षांनी एकदा अधिक महिना येतो. या महिन्यात जावयाला घरी बोलावून पंचपक्वान्न जेवण देण्यासह विविध सोन्या-चांदीच्या वस्तूंची भेट देण्याची परंपरा आजही पाळली जाते. १८ जुलैपासून सुरू झालेल्या अधिक मासाचा शेवट १५ ऑगस्टला झाला.
या काळात सराफा बाजाराला मोठी झळाली मिळालेली दिसली. चांदीचे ताट, ताह्मण, निरांजन, गाय-वासरू, ताट, भांडे, समई, चांदीचे दिवे, कॉइन, तसेच सोन्याची अंगठीची बाजारपेठेत चलती होती.
अधिक मासात सराफ बाजारात झालेली उलाढाल श्रावणात कायम राहील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे, चांदीच्या छोट्या वस्तूंना अधिक मागणी होती.
फॅन्सी जोडवे, नक्षीकाम केलेल्या जोडव्यांसह इटालियन जोडव्यांना मागणी होती. महिनाभर सराफ बाजारात खरेदीसाठी गर्दी झाल्याचे चित्र होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अधिक मास संपेपर्यंत उतरले भाव
अधिक मासाला सुरवात झाल्यानंतर १८ जुलैला चांदी ७७ हजार सातशे रुपये, तर सोने ६१ हजारांपर्यंत होते. अधिक मास संपेपर्यंत १५ ऑगस्टला चांदी ७२ हजार पाचशे, सोने ६० हजार ५५० रुपयांपर्यंत भाव उतरले आहेत.
लेकीला जोडवे तर जावयाला अंगठी, चांदीचे भांडे, कॉइन देत अधिक मासाला भेटवस्तू देण्याची परंपरा जपली गेली.
अधिक मासात सर्वाधिक मागणी चांदीच्या छोट्या वस्तूंना होती. नक्षीकाम, इटालियन जोडव्यांनी ग्राहकांना आकर्षित केले. अधिक मासात सराफ बाजाराला मिळालेली झळाळी श्रावणातही कायम असेल. अधिक मासात सराफ बाजारात कोटींची उलाढाल झाली आहे.
-गिरीश नवसे, अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.