तपश्चारिणीत्वंहितापत्रयनिवारिणीम् |
ब्रह्मरूपधराब्रह्मचारिणी प्रणमाम्यहम् ||
रविवार पेठेतील काचेची देवी म्हणून प्रसिद्ध असलेली सप्तशृंगीदेवी मंदिर अतिप्राचिन आहे. उद्योजक धोंडू पाटील नाशिकचे पाटील म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी देवीसाठी रविवार पेठेत मंदिर बांधले. मंदिराला जवळपास ९० वर्षे झाली आहेत.
उत्सवमूर्तीची सुमारे १५० वर्षांपूर्वीची परंपरा
देवीची मूर्ती वाघावर आरूढ आहे. सप्तशृंगीदेवीच्या मूर्तीपुढे दैत्याचा संहार करताना वाघ आहे. रविवार कारंजा येथे करमकर टॉवर येथे पूर्वी कच्छी वाडा असताना, ही देवी उत्सवमूर्ती म्हणून प्रसिद्ध होती. पूर्वीपासून चैत्र व नवरात्रोत्सवात देवीची मिरवणूक काढून पूजा केली जाते. जवळपास १५० वर्षे जुनी देवीची उत्सवमूर्ती आहे.
पूर्वी कच्छी वाड्यातील ओट्यावर देवी ठेवली जात असे. उद्योजक धोंडू पाटील यांनी देवीसाठी रविवार पेठेत मंदिर बांधले. रविवार पेठ वर्दळीचा रस्ता असल्याने वाहनांची धूळ मोठ्या प्रमाणात उडत असे, म्हणून देवीभोवती काचेचे आवरण बसविण्यात आले आहे. म्हणून ‘काचेची देवी’ म्हणून ही देवी प्रसिद्ध आहे. (Adimaya Adishakti Saptashrungi Devi Temple in raviwar Peth Nashik Latest Marathi News)
विशेष म्हणजे देवीची मूर्ती भव्यदिव्य लोखंडी चाक असलेल्या चौरंगावर स्थित आहे. चौरंगासाठी सागाच्या लाकडाचा वापर केला आहे. देवीची मूर्ती कागद्याच्या लगद्यापासून बनविली आहे. पूर्वीपासून कामत गुरुजी देवीची पूजाअर्चा करीत असे. देवीच्या कृपेने रविवार पेठेत भरभराट आहे. येथील सर्व उद्योजक, व्यापारी सकाळी देवीच्या दर्शनानेच आपल्या दैनंदिन व्यवसायला सुरवात करतात. देवीसाठी सोन्या-चांदीचे दागिने आहेत. मंदिर ट्रस्टमार्फत नवरात्रोत्सवात देवीची पूजा व पाठ करण्यात येतात. कोजागिरीला दूधवाटप केले जाते.
"देवीची मूर्ती भव्य लोखंडी चाके असलेल्या चौरंगावर स्थित आहे. अतिशय मनमोहक देवीची मूर्ती असून, देवीच्या कृपेनेच रविवार पेठेत सतत भरभराट आहे."
-राजेश नागरे, पदाधिकारी, सप्तशृंगीदेवी मंदिर ट्रस्ट
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.