Nashik Aditi Tatkare : प्रभू श्रीराम यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्याच पक्षातील महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी शांततेचा सल्ला दिला आहे.
लोकांच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाचे वक्तव्य आव्हाडांनी करू नये. (Aditi Tatkare advice to Jitendra Awhad Because of controversial statements nashik news)
तसेच तटकरे साहेबांचे ऐकून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कुठलीही राजकीय भूमिका घेतली नाही. कारण अजित पवार ४० वर्षांपासून राजकारणात असल्यामुळे त्यांना कोणाच्याही सल्ल्याची गरज नसल्याचा टोलाही त्यांनी आव्हाडांना लगावला.
महिला व बालकल्याण विभागाच्या विविध कार्यक्रमानिमित्त मंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी (ता.४) नाशिकला भेट दिली. निरीक्षण गृह व बालगृहाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तटकरे म्हणाल्या, मध्य प्रदेशातील ‘लेक लाडकी’ या योजनेला महाराष्ट्रात प्रोत्साहन देत आहोत.
महिला सशक्तीकरणाचे धोरणही राज्य सरकार आखत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या प्रश्नाविषयी मंत्री तटकरे म्हणाल्या, अंगणवाडी सेविकांच्या अनेक मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. तीन हजार अंगणवाडी सेविकांचे प्रश्न मार्गी लावले.
त्यांच्या मानधनाची मागणी गेल्या पाच वर्षांपासून आहे. त्यांना २० टक्के मानधन लागू झाले आहे. त्यांना पेन्शनही मिळावी, हीच राज्य सरकारची भूमिका आहे. पण त्यासाठी थोडा वेळ लागेल. आपल्या मागण्यांविषयी सरकार सकारात्मक असून या सेविकांनी कामबंद करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
अजित पवारांना सल्ल्याची गरज नाही
राजकीय विषयांवर बोलताना मंत्री तटकरे म्हणाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ४० वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यामुळे ते कोणाच्या सांगण्यावरून आपली भूमिका ठरवतील, असे मला वाटत नाही.
त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य हास्यास्पद असेच आहे. आव्हाडांनी अनेकदा आपली राजकीय भूमिका बदलली. आताही त्यांनी लोकांच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. आपल्या वक्तव्यातून धार्मिक भावना दुखावतील, अशा स्वरूपाचे बोलणे योग्य नसल्याचा टोलाही त्यांनी आव्हाडांना लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.