Aditya Thackeray : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श सांगणाऱ्या गद्दारांनी वांद्रातील शाखेवरील बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा चालवला व कार्यालयावर बुलडोझर फिरवला.
राज्यभरात त्या गद्दारांच्या राजकारणावर बुलडोझर फिरविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन ठाकरे गटाचे आमदार तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी (ता. २२) येथे केले.
सातपूर येथील डेमॉक्रसी सभागृहात शिवसेनेचा (ठाकरे गट) मेळावा शनिवारी (ता.२२) आयोजित करण्यात आला होता. (Aditya Thackeray appeal to Get ready to turn bulldozer on politics of traitors nashik news )
त्या वेळी आदित्य ठाकरे बोलत होते. ठाकरे म्हणाले, की, राज्य कृषी व उद्योग क्षेत्रात आघाडीवर असताना दोन्ही क्षेत्रात राज्याची पीछेहाट होण्यास बेभरवशाचे मुख्यमंत्री कारणीभूत आहेत. या सरकारची फक्त तोडफोड करून सत्ता टिकविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न वाऱ्यावर सोडलेले आहेत.
राज्यातून उद्योग बाहेर जात आहेत. वेदांतासारखा उद्योग गुजरातमध्ये गेला आणि मागच्याच महिन्यात गुजरातमध्येही उद्योग उभारण्यास नकार देते उद्योग राज्याबाहेर नव्हे, तर भारताबाहेर गेला. त्यामुळे या राजकारणात राज्याचेच नव्हे तर देशाचे नुकसान झाले, असे सांगत ठाकरेंनी भाजप व फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ला केला.
व्यासपीठावर उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार वैभव नाईक, शुभांगी पाटील, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार वसंत गिते, अनिल कदम, योगेश घोलप, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, दत्ता गायकवाड, गटनेते विलास शिंदे यांच्यासह ठाकरे गटाचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ते पुढे म्हणाले, की केंद्र सरकार केवळ सत्तेचे राजकारण करत असून, महाराष्ट्र व मुंबईचा द्वेष करत आहे. अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी त्यांचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे. केंद्र सरकारची भूमिका हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करणारी असून, मुख्यमंत्री दर दोन दिवसांनी केंद्राच्या भेटीला जात असल्याने कोणाच्या भरवशावर सरकार चालवत आहे, हा प्रश्न पडतो. विधानसभेत गेल्यानंतर या खोकेबाजांची चेहरे पाहण्यासारखे होतात.
आम्हाला निधी देत नसलेल्या अजितदादांचा विरोध म्हणून गद्दारी केल्याचे बोलले जात होते. मात्र आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसताना त्यांना लाज वाटत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आशेवर अनेकांनी बाशिंग बांधलेले होते. त्या सर्व आमदारांना भुई थोपटण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मंत्र्यांसह या आमदारांना आता अपात्र ठरल्यानंतर आमदारकी सोडण्याची वेळ येणार आहे. त्या सर्वांना त्यांची जागा दाखविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज होण्याचे आवाहन या वेळी आदित्य ठाकरे यांनी केले.
तसेच आसाम आणि मणिपूरमध्ये सुरू असलेला गंभीर तमाशा केंद्र सरकारला दिसत नाही का, असा सवाल विचारत आसामचे राज्य सरकार त्यावर काही बोलत नाही. उलट जनतेसमोर सत्य घटना आल्याने तो व्हिडिओ दाखवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचे निर्देश या गुंडगिरीला प्रोत्साहन देणारे असल्याचे ते म्हणाले. मेळाव्यास विविध विभागांचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.