Aditya Thackeray : मणिपूर जळत असताना तुम्ही गप्प कसे? आदित्य ठाकरेंचा भाजपासह शिंदेवर घणाघात

 Yuva Sena chief Aditya Thackeray speaking at the Shiv Sena dialogue meeting here. Shiv Sena officials from across the district on the platform
Yuva Sena chief Aditya Thackeray speaking at the Shiv Sena dialogue meeting here. Shiv Sena officials from across the district on the platform esakal
Updated on

Aditya Thackeray : मणिपूरमध्ये दोन जातीत वाद पेटवून दंगली घडत असताना केंद्र सरकार गप्प कसे? असा सवाल करतानाच देशात जे सूडबुद्धीच व गलिच्छ राजकारण जनतेला पटत नसून या गलिच्छ राजकारणाविरुद्धची लढाई एकजुटीने पुढे घेऊन जावी लागेल.

गलिच्छ राजकारण साफ करणारी लाट महाराष्ट्रात आली असून येत्या निवडणुकांमध्ये त्याचा निकाल दिसून येईल, असे प्रतिपादन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

येथील महात्मा फुले नाट्यगृहात शनिवारी मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी संवाद मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते. (aditya thackeray questions bjp shinde government in yeola meeting nashik news)

शिवसेना सचिव सूरज चव्हाण, उपनेते सुनील बागूल, अद्वय हिरे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार वैभव नाईक, माजी आमदार कल्याणराव पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, गणेश धात्रक, नितीन आहेर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. माणिकराव शिंदे, सभेचे आयोजक जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, युवा नेते संभाजीराजे पवार, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दत्ताजी गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, ‘मणिपूरमध्ये तीन महिलांवर अत्याचार झाले. त्यातील एका महिलेचा पती कारगिल युद्धात लढलेला होता. हे अत्याचार होत असताना कुठे गेली तुमची देशभक्ती? असा सवाल त्यांनी भाजपला केला. मणिपूरवर बोलायला केंद्र व राज्य सरकार तयार नाही महिलांवर अत्याचार होत आहेत तरीही सरकार गप्प का? असा प्रश्न देखील ठाकरे यांनी केला.

राज्यातील गावागावांमध्ये ५० खोक्यांची चाल लोकांना आवडलेली नाही. शिवसेनेतून जे पळाले त्यांची परिस्थिती आज ‘ओके’ नाही असा टोला लगावत राज्यात केवळ घोषणाबाज सरकार दिसत असून हे खोके सरकार तुमच्या मनात पोहोचलय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 Yuva Sena chief Aditya Thackeray speaking at the Shiv Sena dialogue meeting here. Shiv Sena officials from across the district on the platform
Maharashtra Politics : अजित पवार मुख्यमंत्री होणार? CM शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट

कर्जमुक्तीची अजूनही प्रतीक्षा

उद्धव ठाकरे साहेबांच्या रूपाने कोरोनाच्या काळात संवेदनशील मुख्यमंत्री तुम्ही पाहिला. अतिशय संकटाचा काळ असताना ते जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत होते. सध्याचे मुख्यमंत्री जनतेच्या प्रश्नावर बोलायलाच तयार नाहीत. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्जमुक्ती दिली.

साडेचौदा हजार कोटींची कर्जमाफी राज्यातील शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मिळाली होती. दोन लाखापुढील कर्जमुक्ती देखील देण्याचे आम्ही निश्चित केले होते. पण खोकेबहाद्दरांनी सरकार पाडून महाराष्ट्राला धोका दिला. खोके सरकारची कर्जमुक्ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही.

शेतकऱ्यांचा आवाज कोण ऐकतोय?

महाविकास आघाडीने आपल्या अडीच वर्षात राज्यात असंख्य उद्योगधंदे आणले. उद्धव साहेबांच्या कामामुळे देशातील मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांना दुसरा नंबर मिळाला. आज मात्र गेल्या वर्षात एकही उद्योग या महाराष्ट्रात आला का? एकही रोजगार मिळाला का, सर्वच उद्योग कुठे गेले असे अनेक सवाल यावेळी ठाकरे यांनी केले.

 Yuva Sena chief Aditya Thackeray speaking at the Shiv Sena dialogue meeting here. Shiv Sena officials from across the district on the platform
Shivsena : विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीला ठाकरे गट उत्तर देणार नाही; कारण..

चिखलफेक, बदनामी, स्वार्थासाठीचे राजकारण, धाडीचे राजकारण, सूडबुद्धीच राजकारण असे जे काही गलिच्छ राजकारण चाललं आहे, ते महाराष्ट्राच्या व देशाच्या हिताचे नाही. आपल्या देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने चालली आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी सध्या शेतकऱ्यांचा आवाज ऐकणारे राज्याच्या मंत्रिमंडळात कोणी आहे का? तरुणांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे आवाज ऐकणारे कोणीही नाही. शिवसेनेतील फुटीरांबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, जे गद्दार बाहेर गेले, ते मंत्रिपद मिळेल यासाठी अजूनही लोटांगण घालताहेत असेही ठाकरे म्हणाले.

जिल्ह्यात पुन्हा शिवसेनेची लाट

शिवसेना उपनेते अद्वय हिरे,आमदार नरेंद्र दराडे,शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे,शिवा सुराशे,किशोर सोनवणे,चंद्रकांत शिंदे आदींनी मनोगत व्यक्त करून जिल्ह्यात पुन्हा शिवसेनेची लाट येणार आहे, जनतेची कामे प्रामाणिकपणे करून निवडणुकीत नक्कीच ठाकरे गट अव्वल राहील असा विश्वास व्यक्त केला.

 Yuva Sena chief Aditya Thackeray speaking at the Shiv Sena dialogue meeting here. Shiv Sena officials from across the district on the platform
Uddhav Thackeray in Irshalwadi: "मला राजकारण करायचे नाही, पण..." इर्शाळवाडीतील घटनेवर उद्धव ठाकरेंनी दिला सरकारला सल्ला

तालुकाप्रमुख रतन बोरणारे, भास्कर कोंढरे, राजेंद्र लोणारी, छगन आहेर, डॉ. सुधीर जाधव, उपसभापती ॲड. बापू गायकवाड, झुंजारराव देशमुख, प्रवीण गायकवाड, ॲड. मंगेश भगत, लक्ष्मण गवळी, शाहू शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख, राजेश भंडारी, प्रीतम पटणी, अरुण काळे, महेश काळे, भारती जाधव, सुमित्रा बोठे, अरुण शेलार, लक्ष्मण गवळी, सारी अन्सारी, छगन आहेर, किशोर सोनवणे, भारती जाधव, सुमित्रा बुटे, दीपाली नागपुरे, बापू जाधव, राजाभाऊ दरेकर, नाना जेऊघाले, केशव जाधव, संतोष पानगव्हाणे, बाळासाहेब जगताप, बाळासाहेब पिंपरकर, पुंडलिक पाचपुते, अशोक आव्हाड, विठ्ठल महाले, चंद्रकांत शिंदे, गणेश पिंढरी, अनंता आहेर, जनार्दन भवर, भाऊराव कुदळ, मनोज रंधे, बापू काळे, दत्तात्रय वैद्य, देविदास निकम, मकरंद तक्ते, मॉन्टी मथुरे, पप्पू भुसे, राहुल लोणारी, दीपक भदाणे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे कर्हेकर, मनसेचे बुब शिवसेनेत

मेळाव्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी व समता परिषदेचे माजी शहरप्रमुख विष्णुपंत कर्हेकर यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी रहेमत शेख, शकील पटेल, अब्रार अन्सारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेमेचे रितेश बूब यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

 Yuva Sena chief Aditya Thackeray speaking at the Shiv Sena dialogue meeting here. Shiv Sena officials from across the district on the platform
Aditya Thackeray : आम्ही भोळे आहोत, उद्धव साहेबांना अन् मला राजकारण कळत नाही; नाशिकमध्ये आदित्य ठाकरे भावनिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()