नाशिक : चाळीस गद्दारांवर एवढा विश्वास ठेवला, की त्यांना मिठी दिली; पण त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) विचारांनुसार चालणारे असल्याचे ते सांगतात अन् दुसरीकडे त्यांच्याच मुलाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचतात.
हिंमत असेल तर राजीनामा द्या अन् निवडणुकीला सामोरे जा, अशी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर केली. (Aditya Thackeray statement about maharashtra politics nashik Latest Marathi News)
शिवसेनेतर्फे इंदिरानगर येथील मनोहर गार्डन येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिवसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपनेते सुनील बागूल, माजी आमदार वसंत गिते, राजाभाऊ वाजे, योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यभर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आमदारापाठोपाठ शिवसेनेचे खासदारही शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. नाशिकचे खासदार हेमंत गोडसेही त्याच वाटेने गेले आहेत.
अशा फुटीच्या तोंडावर शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे गुरुवारी (ता. २१) नाशिकच्या दौऱ्यावर काय बोलतात, याकडे लक्ष लागले होते. शिवसेनेतील डागडुजीसाठी रस्त्यावर उतरलेल्या शिवसेनेच्या युवराजांनी शिवसंपर्क मेळाव्यात एकजुटीसाठी भावनिक आवाहन केले.
ते म्हणाले, की राज्याच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर कधी नागरिकांच्या डोळ्यात अश्रू पाहिले नाही. मात्र पक्षप्रमुख ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर कितीतरी नागरिकांच्या डोळ्यात पाणी पाहिले. निष्ठावान शिवसैनिक हीच शिवसेनेची ओळख आहे. गद्दार आमच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. ते उठाव केल्याचे सांगतात मात्र ही गद्दारीच आहे.
घोषणाबाजीने वातावरण भगवामय
पाचची वेळ असली तरी सायंकाळी साडेसातला मेळावा सुरू झाला. त्यांचे आगमन होताच घोषणाबाजी, शिट्यांमुळे वातावरणात जोश होता. ठाकरे उभे राहिल्यानंतर प्रारंभीचे पाच ते दहा मिनिटे घोषणाबाजीच सुरू होती.
सरकार घटनाबाह्य
राज्यात अतिवृष्टी झाली असून, शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. हे सरकारच घटनाबाह्य आहे. येत्या दिवसात देशाची स्थिती अस्थिर होण्याचा इशारा ठाकरे यांनी दिला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.