Aditya Thackeray News : विकासाच्या बाबतीत शहराला पुढे नेण्यासाठी नेतृत्वाची आवश्यकता असते. परंतु दुर्दैवाने नाशिकला तसे नेतृत्व मिळाले नाही. नाशिक दत्तक घेणारे पिता बहुमताने सत्ता देवूनही विकास करू शकले नाही, असे चिमटा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी काढत शहर विकासावरून भाजपला टार्गेट केले.
शाश्वत विकास या विषयावर युवकांना थेट प्रश्न विचारण्यासाठी ‘यंग इंडिया’ संस्थेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. (aditya thackeray statement on bjp nashik news)
नाशिकमध्ये बहुमत असताना शहराचा विकास झाला नाही. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून महाराष्ट्रात निवडणुका नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडे उत्तर मागायचे कोणी, असा सवाल करताना आदित्य ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होण्यामागे सरकार कारणीभूत असल्याचे अंगुलिनिर्देश केला. प्रश्न विचारणारा लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासन मस्त आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाई नाही. शाश्वत विकासावर चर्चा करताना मागील पन्नास वर्षांच्या चुका किंवा निर्णय योग्य की अयोग्य यावर चर्चाच होते. परंतु भविष्याचा किंवा पुढील पन्नास वर्षांचा विचार करून विकासासाठी काय करता येईल यासंदर्भात चर्चा होत नाही, ती झाली पाहिजे. तन्मय टकले, वेदांत राठी आदींनी प्रश्न विचारले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दाव्यांचीच काढली हवा
महापालिकेत मनसेची पाच वर्षे सत्ता होती. या सत्ताकाळात मनसेकडून ‘न भुतो’ असा दावा केला जात आहे, तर छगन भुजबळ यांच्या खंबीर नेतृत्वामुळे नाशिक शहरासह ग्रामिण भागाचे अनेक प्रश्न मार्गी लावल्याचा दावा करतात. भाजपच्या पाच वर्षाच्या सत्ताकाळात विकासाला गती मिळाल्याचा दावा होत असताना आदित्य ठाकरे यांनी युवकांच्या दिलेल्या प्रश्नांतून सर्व दाव्यांचीच हवा काढली.
नाशिक शहराला विकासाच्या संदर्भात पुढे नेणारा राजकीय नेता मिळाला नाही. रोजगार नाही, उद्योग नाही, पर्यटनाला चालना नाही. असे एक ना अनेक प्रश्न आहेत. नाशिकच्या विकासासाठी कोणी पुढाकार घेतला नाही. नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली, परंतु प्रत्यक्षात काहीच कामे झाली नाहीत हे जाणवतं असल्याचे ते म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.