Aditya Thackeray | गद्दारांना जनतेने धडा शिकवावा : आदित्य ठाकरे

Officials welcoming Thackeray.
Officials welcoming Thackeray.esakal
Updated on

चांदोरी (जि. नाशिक) : राज्यात होर्डिंग्जवर तब्बल ५० कोटी रूपये खर्च केले जातात. मात्र, शेतकऱ्यांना साधी मदत दिली नाही.

पाठीवर चाळीस वार करणाऱ्या गद्दार सरकारला जनतेनेच धडा शिकवावा, असे आवाहन करतानाच आगामी निवडणुकीत शिवसेना शंभर आमदार निवडून आणेल, असा विश्‍वास युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. (Aditya Thackeray statement targetting opposition People should teach lesson nashik news)

शिवसंवाद दौऱ्यात मंगळवारी (ता. ७) चांदोरी येथे झालेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख जयंत दिंडे, माजी आमदार अनिल कदम, उपनेते सुनील बागुल, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे, आमदार नरेंद्र दराडे, गोकुळ गीते, माजी सरपंच संदीप टर्ले, नीलेश पाटील, सुधीर कराड, सुलभा पवार, दीपक शिरसाट, उत्तम गडाख व्यासपीठावर होते.

श्री. दानवे म्हणाले, बांगलादेशला द्राक्ष जातात. पण, मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट ड्युटी लावली जात आहे. शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान रडतखडत दिले. जिल्हा बँकेकडून यादी देऊनही ठराविक शेतकऱ्यांनाच अनुदान दिले.

नुकसान भरपाई अजून दिलेली नाही. कांद्याच्या बाबतीतही आयात- निर्यात धोरण चुकीचे राबवत आहे. माजी आमदार अनिल कदम म्हणाले, राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्जदाराचे दहा लाख रुपयांचे कर्ज सेटलमेंट करून दोन लाखात भरले जाते.

मात्र, जिल्हा बँकेच्या कर्जदार सभासदांना कुठलाही दिलासा दिला जात नाही. सोसायट्यांना व्याजात सवलत दिली जात नाही. निफाड तालुक्यात विजेचा प्रश्‍न गंभीर असून, त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी असूनही ते पिकांना देणे शक्य होत नाही. दरम्यान, या वेळी असंख्य कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Officials welcoming Thackeray.
Aditya Thackeray | हे सरकार दिल्लीचे आहे की शेतकर्‍यांचे आहे : आदित्य ठाकरे

आशिष शिंदे, सरपंच विनायक खरात, उत्तम पाटील गडाख, शहर प्रमुख संदीप गडाख, संदीप जाधव, संजय शेळके, प्रकाश ढेमसे, बाबाजी गायखे, माजी पंचायत समिती सभापती राजेश पाटील, खंडू बोडके, गणेश नाठे, राजेंद्र हिरे, शहाजी राजोळे, संजय कुंदे, तुषार खरात, सुलभा पवार, निलेश कोटमे, दौलत टर्ले, शंकर संगमनेरे आदी या वेळी उपस्थित होते. सुहास सुरळीकर यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम रंधवे यांनी आभार मानले.

शिंदे सरकार महाराष्ट्राचे की गुजरातचे?

शिंदे सरकारने महाराष्ट्रात राहून गुजरातला उद्योग दिले.दिल्लीत झुकणारे हे सरकार शेतकरी हिताचे नाही.तरुणांचा रोजगार हिरावला गेला.शंभर टक्के गुंतवणूक होणाऱ्या उद्योगांना गुजरातला पाठविले ही बाब निश्चितच मराठी माणसाशी केलेली प्रतारणा आहे.

या सरकारला सामान्यांशी काहीही देणेघेणे नाही. अशा सरकारला पायउतार करण्यासाठी सज्ज रहावे,असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले.

Officials welcoming Thackeray.
Aditya Thackeray | खोके सरकारकडून पोकळ अश्‍वासनं : आदित्य ठाकरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.