Somvati Amavasya 2023: मार्कंडेय पर्वतावरील सोमवती अमावस्या यात्रोत्सवास प्रशासनाकडून बंदी

Administration bans Somvati Amavasya yatrotsav on Markandeya mountain nashik news
Administration bans Somvati Amavasya yatrotsav on Markandeya mountain nashik news
Updated on

Somvati Amavasya 2023 : श्रीक्षेत्र मार्कंडेय पर्वतावर सोमवती अमावस्ये निमित्त सोमवार ता. १३ रोजी होणारा श्री मार्कंडेश्वर यात्रोत्सव पर्वतावर जाण्यासाठी असुरक्षित मार्ग व जीर्ण झालेल्या लोखंडी शिड्याचे कारण देत प्रशासनाने रद्द केल्याचा आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कळवणचे उपविभागीय अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिला आहे.

दरम्यान प्रशासनाकडून पर्वतावर जाणारा मार्ग सुरक्षित करण्याचे कामे न करता लागोपाठ दोन यात्रोत्सव रद्द करण्याचे आदेश देवून आपल्या जबाबदारीतून मुक्त होत, भाविकांच्या श्रद्देस बाधा पोहचवित असल्याची भावना भाविकांमध्ये व्यक्त होत आहे.

मार्कंडेय ऋषींची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेय पर्वतावर वर्षभरात येणाऱ्या सोमवती अमावस्या व ऋषीपंचमी निमित्त यात्रा भरत असते. (Administration bans Somvati Amavasya yatrotsav on Markandeya mountain nashik news)

या यात्रांसाठी जिल्हासह संपूर्ण राज्यभरातून तसेच गुजरात, मध्यप्रदेशातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यात पावसाळ्यात निसर्ग सौंदर्यांने नटलेल्या मार्कंडेय पर्वतावर श्रावण महिन्यात भाविक व पर्यटकांची रेलचेल असते. दरम्यान १ ऑक्टोबर २०२३ रोजी सरपंच, मार्कड पिंप्री, ता. कळवण यांनी य मार्कंडेय पर्वतावर सोमवती अमावस्येनिमित्त १३ ऑक्टोबर रोजी दर्शनासाठी यात्रा भरविणेची परवानगी मिळणेबाबत अर्ज तहसिलदार कळवण यांच्याकडे केला होता.

मात्र तहसिलदार कळवण पोलीस निरीक्षक कळवण व मंडळ अधिकारी कळवण यांनी, सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नलवाडे यांचेकडे सादर केला आहे. त्यानूसार मागील सोमवती अमावस्येच्या दिवशी मार्कंडेय पर्वतावर दुर्घटना झाली असुन दरड पडल्याने 5 ते 6 भाविक जखमी झाले होते. तसेच पर्वतावर पहिल्या टप्प्याजवळ असणारी लोखंडी पुल अरुंद व कमकुवत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पर्वतावर जाणासाठी पायवाटा ही निसरडया आहेत बारीतील रस्ता अरुंड असून बारीमध्ये यात्रा लावणेसाठी पुरेशी जागा नाही.

त्यामुळे पुढील दुर्घटना टाळणेसाठी यात्रेला व मार्कंडेय पर्वतावर मंदिरात जाण्यासाठी परवानगी देवू नये, असा अभिप्राय दिलेला आहे.तसेच नाशिक जिल्हा तसेच बाहेरराज्यातुन तसेच कळवण पंचक्रोषीतुन हजारोच्या संख्येने भाविक मार्कड ऋषीपर्वतावर दर्शन घेणेसाठी येत असतात.

यापुर्वी देखील मोठयाप्रमाणात झालेल्या गर्दीतून वणी पोस्ट येथील काही भाविक अवघड व चुकीच्या मार्गाने मार्कडऋषी पर्वत चढत असतांना 2 भाविक दगड कोसळुन जखमी झाल्याची घटना घडली आहे. तसेच 3 भाविक सुध्दा अवघड मार्गाने जातांना पाय घसरुन खोलदरीत पडून जखमी झाल्याची घटना घडली आहे.

Administration bans Somvati Amavasya yatrotsav on Markandeya mountain nashik news
Nashik Simhasth Kumbhmela: सिंहस्थाचा आराखडा 11 हजार कोटींवर; भूसंपादनासाठी 3 हजार कोटींचा प्रस्ताव

तसेच मार्कंडेय पर्वतावर जातांना सपाटी भागाजवळ पर्वतावर जाण्यासाठी अरुंद असा लोखंडी जिना दुर्लक्षित जिर्ण स्वरुपाचा व तुटल्याच्या परिस्थितीत आहे. व सदरचा मार्ग अरुंद असल्याने पर्वतावर जाणारे भाविक व उतरणारे भाविक समोरासमोर येवुन गुदमरुन तसेच लोखंडी पायरी तुटुण मोठया प्रमाणवर जिवीतहानी होण्याची दाट शक्यता आहे.

त्याअर्थी, मार्कंडेय पर्वतावर भाविकांची गर्दी होऊ नये, लोकांच्या जिवितास हानी होऊ नये व अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 34 नुसार मार्कडऋषी पर्वतावर दि. १३ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या सोमवती अमावस्येनिमित्त यात्रा भरविण्याची परवानगी सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी नाकारली आहे. तसेच मार्कडऋषी पर्वतावर भाविकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या दिवशी फक्त भाविकांना पहिल्या पायरीवर दर्शन घेता येणार असून भाविकांना मुळाणे व गोबापुर गावाच्या परीसरात वाहने पार्कींग करावी लागणार आहे. याबाबत कोणतीही जिवित व वित्तहानी होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणेनी/विभागानी घ्यावी असा आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांनी दिला आहे.

दरम्यान याआधी प्रशासनाने २० सप्टेंबर २०२३ रोजीची ऋषीपंचमीची यात्रोत्सवही हेच कारण देत बंदी घातली होती. झालेल्या दुर्घटनेस चार महिन्याचा कालावधी उलटुन पर्वतावर जाणाऱ्या रस्ता सुरक्षितेच्या कामांकडे दुर्लक्ष करुन प्रशासन आपली जबाबदारी झटकण्यासाठी यात्रोत्सवास बंदी घालत असल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त आहे.

Administration bans Somvati Amavasya yatrotsav on Markandeya mountain nashik news
Diwali 2023: प्रवाशांनी फुलली बसस्‍थानके विद्यार्थी, चाकरमान्‍यांना लागले घराचे वेध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()