सिडको (जि. नाशिक) : राणाप्रताप चौकात असलेले महाराणा प्रताप उद्यानात शोभेसाठी बसविलेले पोल अक्षरशः तुटून पडलेले असून, महापालिका प्रशासनाने या उद्यानाच्या देखभालीकडे पाठ फिरवली असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत आहे. उद्यानात मोठ्या प्रमाणावर पालापाचोळा पडलेला असून येथील साफसफाई करण्याची तसदीदेखील प्रशासनाकडून घेतली जात नाही. (Administration ignorance towards park maintenance Maharana Pratap Udyan in problems Nashik News)
वारंवार येथील स्थानिक रहिवासी तक्रारी करत असतात. उद्यानात विषारी प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याचेदेखील स्थानिक रहिवासी सांगत आहेत. उद्यानात एक पथदीप अगदी पडण्याच्या स्थितीत आला असून, तो कधीही तुटून खाली पडू शकतो. तर एखादा अनुचित प्रकार घडू शकतो याची शक्यता नाकारता येत नाही.
उद्यानात मोटारीसाठी असलेल्या विद्युत प्रवाहाचे किट उघड्यावर असून त्याचे झाकण तुटलेल्या अवस्थेत आहे. इतकेच नाही तर या बोअरवेलना पाणीच येत नसल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे. उद्यानातील ग्रीन जिमची दुरवस्था असून येथील पथदीपांची दुरवस्था झालेली आहे. यातील विद्युत वाहिनी उघड्या असून, रात्री मद्यपी उद्यानात ठाण मांडून असतात.
* उद्यानात कचरा समस्या मोठ्या स्वरूपात
* विद्युत पोल कधीही तुटू शकतो.
* विद्युत प्रवाह करणाऱ्या अनेक तारी खुल्या
* ग्रीन जिमचे साहित्य मोडीत
* मद्यपींचा सुळसुळाट
* उद्यान रात्री अंधारात
"उद्यान असूनही आमच्यासाठी नसल्यासारखे आहे. उद्यानाचा उपभोग घेताच येत नाही. येथे मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य असून, येथील स्वच्छता करणे गरजेचे आहे."
- पुष्पा सोनजे, गृहिणी
"उद्यानात स्वच्छता नसल्याने येथे विषारी प्राण्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, रात्री अंधाराचा फायदा घेत मद्यपी येथे मद्यप्राशन करण्यासाठी बसलेले असतात. आम्हा महिलांना या उद्यानाचा काही उपयोग होत नाही." - कविता थोरात, गृहिणी
"उद्यानामधील एक पथदीप पूर्णता पडण्याच्या अवस्थेत असून, कधीही खाली पडू शकतो. याकडे महापालिका प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन या पुलास एकतर काढून घ्यावे किंवा याला सरळ तरी करून द्यावे. जेणेकरून येथे अपघात घडणार नाही."- लता भांबरे, गृहिणी
"उद्यानामधील अनेक पथदीप बंद अवस्थेत असून, या पथदीपांच्या अनेक तारी उघड्यावर आहेत. लहान मुले खेळत असताना चुकून एखादा वाहिनीला स्पर्श झाला आणि एखादा अपघात घडला तर जबाबदार कोणास धरायचे. उद्यानाची दुरवस्था लक्षात घेता मनपा प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे." - राधा पारसवार, गृहिणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.