नाशिक : अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तीन दिवसांत सहा हजार ८६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. उपलब्ध जागांपैकी २५.९४ टक्के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. दरम्यान, सध्याच्या वेळापत्रकानुसार शनिवारी (ता.६) पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीची अखेरची संधी असणार आहे.
यात मुदतवाढ दिली जाते, की वेळापत्रकानुसार दुसऱ्या फेरीची प्रक्रिया राबविली जाते, याकडे लक्ष लागले आहे. (Admission 2022 11th admission in 26 percent seats in 3 days nashik Latest Marathi news)
नाशिक महापालिका क्षेत्रातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची महाविद्यालयांत झुंबड बघायला मिळत आहे. अनेक विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही उपस्थित राहून, प्रक्रिया पूर्ण करताना धावपळ करत आहेत. पहिली निवडयादी जाहीर झाल्यापासून तीन दिवसांत प्रवेश निश्चितीची लगबग बघायला मिळत आहे. या फेऱ्यांच्या माध्यमातून २२ हजार ३१४ जागा उपलब्ध आहेत.
कोट्याच्या ९५८ जागांवर प्रवेश
महापालिका क्षेत्रात कोट्यांतर्गत तीन हजार २०८ जागा उपलब्ध आहेत. यापैकी ९५८ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. इनहाउस, अल्पसंख्याक व मॅनेजमेंट कोट्याच्या जागांचा यात समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.