Admission: विशेष फेरीत 3 हजार 656 विद्यार्थ्यांचे प्रवेश; पावसामुळे प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून इतकी मुदतवाढ

Admission
Admissionesakal
Updated on

Admission Process : इयत्ता अकरावीच्‍या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्‍या विशेष फेरीला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. या फेरीत सहभागींपैकी निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांची, तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या यापूर्वीच्‍या फेऱ्यांच्या तुलनेत समाधानकारक आहे.

या फेरीत निवड झालेल्‍या चार हजार २९३ पैकी तीन हजार ७५६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. पावसामुळे शिक्षण विभागाने उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीसाठी सोमवार (ता.३१) पर्यंत मुदतवाढ दिली आहे. (Admission of 3 thousand 656 students in special round Due to rain education department extended deadline for admission nashik)

नाशिक महापालिका क्षेत्रातील ६६ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्‍या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. आत्तापर्यंत तीन नियमित फेऱ्या पार पडल्‍यानंतर नुकतीच पहिल्‍या विशेष फेरीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

यापूर्वीच्‍या नियमित फेऱ्यांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्‍या तुलनेत त्‍यांनी नोंदविलेल्‍या प्राधान्‍यक्रमानुसार निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. त्‍यातही गुणवत्ता यादीत निवड झालेल्‍यांपैकी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील कमी होती.

त्‍यामुळे मोठ्या प्रमाणावर जागा रिक्‍त राहिलेल्‍या होत्‍या. परंतु पहिल्‍या विशेष फेरीत तीन हजाराहून अधिक प्रवेश झाल्‍याने ही सर्वाधिक यशस्‍वी फेरी मानली जाते आहे.

नऊ हजार जागा रिक्‍त

पहिली विशेष फेरी पार पडल्‍यानंतरही सुमारे नऊ हजाराहून अधिक जागा रिक्‍त राहणार आहेत. नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या पंचवीस हजाराहून अधिक असताना प्रत्‍यक्षात जेमतेम सोळा हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Admission
Nashik News: शहरात लवकरच सिग्नलवर ई-चलन यंत्रणा! 800 CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहतुकीवर नियंत्रण

त्‍यामुळे रिक्‍त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यासाठी पुढे कशा स्वरूपाची प्रक्रिया राबविली जाते, याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून राहणार आहे.

प्रवेशाची फेरीनिहाय स्‍थिती

फेरी सहभागी विद्यार्थी यादीतील विद्यार्थी संख्या प्रवेशित विद्यार्थी संख्या

पहिली नियमित फेरी १५,५१४ ११,९५३ ७,३०७

दुसरी नियमित फेरी ८,८२८ ४,८९० २,४३६

तिसरी नियमित फेरी ८,५८० ३,७८१ १,२५९

पहिली विशेष फेरी ४,४८७ ४,२९३ ३,७५६

Admission
Nashik News: फाळके स्मारक पुनर्विकासाचा प्रस्ताव धूळखात; NMCला सल्लागार मिळत नसल्याचा परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.