अकरावीची प्रवेश प्रक्रिया खोळंबली

admission process delay
admission process delay esakal
Updated on

नाशिक : दहावीचा निकाल जाहीर होऊन नऊ दिवस उलटूनही अकरावीची प्रवेश प्रक्रिया खोळंबलेली आहे. नाशिक महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी केंद्रीभूत ऑनलाइन प्रक्रियेतून प्रवेश दिले जाणार आहेत. परंतु, अर्जाचा भाग दोन भरण्यासंदर्भात अद्याप कुठलेही दिशानिर्देश शिक्षण विभागाने जारी केलेले नसल्‍याने विद्यार्थी व पालकांकडून संताप व्‍यक्‍त होतो आहे.

admission process delay
शिष्यवृत्ती अर्जासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता गेल्‍या ३० मेपासूनच अकरावीच्‍या ऑनलाइन अर्ज भरण्याच्‍या प्रक्रियेला सुरवात झाली होती. नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेशाकरिता राबविल्‍या जाणाऱ्या या प्रक्रियेअंतर्गत अर्जाचा भाग एक हा विद्यार्थ्यांना भरता येत होता. यादरम्‍यान गेल्‍या १७ जूनला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला.

त्‍यानंतर महाविद्यालय व शाखांची निवड करण्यासाठी आवश्‍यक असलेला अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरु होणे अपेक्षित होते. परंतु नऊ दिवस उलटूनही ही प्रक्रिया सुरु झालेली नाही. सीबीएसई, आयसीएसईसह अन्‍य बोर्डाचे निकाल अद्यापही जाहीर झालेले नाही. यामुळे प्रवेश प्रक्रियेची गती मंदावल्‍याची शक्‍यता वर्तविली जाते आहे.

२१ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत इयत्ता अकरावीच्‍या सुमारे साडेबावीस हजार जागा उपलब्‍ध आहेत. अशात आत्तापर्यंत संकेतस्‍थळावर २१ हजार ७४ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. यापैकी १६ हजार १७३ अर्ज लॉक केलेले आहेत. चार हजार ७४१ अर्ज पडताळणी झालेली आहे. अर्जाचा भाग दोन सुरु झाल्‍यानंतरच प्रवेश प्रक्रियेला गती प्राप्त होऊ शकेल.

admission process delay
‘सीईटी’च्या अर्जात सुधारणेची मिळणार संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.