Nashik Crime : अन्न-औषध प्रशासनाने धडक कारवाई करीत परराज्यांतून येणारा २२ हजार ३०० रुपयांचा १३० किलो स्वीट मावा जप्त केला.
शहरातील बरेच मिठाई विक्रेते परराज्यांतून येणाऱ्या स्पेशल बर्फीचा वापर पेढा, बर्फी, मिठाई व तत्सम पदार्थ बनविण्यासाठी करीत असल्याची माहिती मिळाल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. (Adulterated sweets in Nashik from foreign states 130 kg seized in Food and Drug Administration operation Nashik Crime)
कारवाईत द्वारका येथील वीर ट्रॅव्हल्स आणि पार्सल सर्व्हिसेस येथे अधिकाऱ्यांनी पाळत ठेवली. त्यानंतर तेथे आलेल्या खासगी प्रवासी बसमधून नाशिक येथील उपनगरमधील यशराज डेअरी ॲन्ड स्वीट्स व सिन्नर तालुक्यातील आडवाडी येथील शांताराम बिन्नर यांनी गुजरातमधून डेलिशियस स्वीट्स व हलवा हे अन्नपदार्थ मागविले असल्याचे आढळून आले.
त्यानंतर संबंधित विक्रेत्याकडून वरील अन्नपदार्थांचे नमुने घेऊन उर्वरित १३० किलो २२ हजार ३०० वजनाचा साठा जप्त करण्यात आला.
कारवाईबाबत अन्न व सुरक्षा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की परिवहन कायद्यानुसार खासगी प्रवासी बसद्वारे व्यावसायिक दृष्टीने सामान किंवा अन्नपदार्थांची वाहतूक करता येत नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे नाशिक विभागातील सर्व खासगी बस वाहतूकदारांनी अन्नपदार्थांची वाहतूक करू नये. त्याचप्रमाणे नाशिक शहरातील मिठाई विक्रेता संघटना प्रतिनिधींची बैठक घेऊन विक्रेत्यांना गुजरात बर्फीचा वापर करून पेढे, मिठाई बनवून त्यांची विक्री करू नये, याबाबत सूचना दिल्या आहेत.
नाशिक विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे व सहाय्यक आयुक्त मनीष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन व प्रमोद पाटील यांनी ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.