Student Mental Health : विद्यार्थ्यांनो, अपयशाने खचू नका तर उभारी घ्या; आत्महत्येचा पर्याय चुकीचा

Students Mental Health
Students Mental Health esakal
Updated on

Student Mental Health : आयुष्य सुंदर आहे. या सुंदर आयुष्यात जगण्याचा आनंद घेताना अनेक खाचखळग्यातून जीवनक्रम सुरू असतो. या खाचखळग्यातूनही जगताना पाठीशी अनुभव येत असतो. असे असताना एका अपयशाने खचून जाऊन नैराश्‍याच्या गर्तेत अडकू नये.

उलट, अधिक जोमाने अपयशाला सामोरे जावे आणि नव्याने उभारी घेऊन जीवनाचा आनंद लुटला तर नैराश्‍याची चिंताच राहत नाही. मात्र, अगदी कोवळ्या वयात जगण्याचा आनंद घेण्याऐवजी स्पर्धा परीक्षा आणि करियरच्या चिंतेने मुले ग्रासली आहेत. (advice to Students about how to handle failure nashik news)

त्यातच पालकांच्या वाढलेल्या अतिअपेक्षांच्या ओझ्याखाली आजची तरुणाई दबली जाते आहे. त्यातून ही मुले अपयशाच्या पहिल्याच पायरीवर कोलमडून पडतात आणि नको ते टोकाचे पाऊल उचलून आपली यात्रा संपवत आहेत. ही बाब आजच्या समाजासमोर मोठा गुंता निर्माण करीत आहे.

गेल्या महिन्यात बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना, वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठीच्या नीट आणि अभियांत्रिकी क्षेत्रात जाणाऱ्यांना सीईटी (सामाईक प्रवेश परीक्षा) या परीक्षांच्या निकालाचे वेध लागले होते. या परीक्षांचा निकालही गेल्या आठवड्यात जाहीर झाला.

अत्यंत कठीण आणि याच परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवर विद्यार्थ्यांच्या भवितव्याला कलाटणी मिळत असते. लाखो विद्यार्थ्यांनी या परीक्षा दिलेल्या असतात, म्हणून प्रत्येकालाच त्याच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करता येते असे होत नाही. गुणांची स्पर्धा असते. चांगले गुण मिळाले तर पाहिजे त्या अभ्यासक्रमाला आणि चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Students Mental Health
Students Mental Health : यश की अपयश? परीक्षेची भीती वाटते? असे करा स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार...

गुण कमी मिळाले तर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतो आहे. त्यातच पालकांकडून आपल्या मुलांबद्दलही अतिअपेक्षा बाळगल्या जातात. कमी गुण मिळाले तर पालकांनी आपल्या मुलांना समजून घेण्याऐवजी इतरांची त्यांची तुलना केली जाते. यातून मुले नैराश्‍याच्या गर्तेत सापडत आहेत. त्यामुळे काही मुले कोवळ्या वयातच अतिताणतणाव व दडपणाखाली आपल्या जगण्याचा हक्क गमावून बसताहेत. आपली जीवनयात्राच संपवून टाकत आहेत.

दोन घटनांनी खळबळ

नाशिकमध्ये बारावी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यात एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. दोन दिवसांपूर्वीच पंचवटीतील १७ वर्षीय ओम धात्रक याने नीट आणि सीईटी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

तर, शहरातीलच एका डॉक्टरच्या मुलीला नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले. त्यामुळे ती नैराश्‍येत आली आणि तिने विषारी औषध सेवन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून ती बचावली आहे. या घटनांनी पालकांनी अंतर्मुख होण्याची आवश्‍यकता व्यक्त होते आहे.

Students Mental Health
Mental Health Problems : मानसिक आरोग्याच्या विळख्यात मेंटली फिट कसं रहायचं? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

पालकांनो, संवाद साधा

आजघडीला प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. पहिलीच्या वर्गासाठी चांगल्या शाळेत प्रवेश घेण्यापासून चिमुकल्याला स्पर्धेला सामोरे जावे लागते आहे. करियरच्या टप्प्यावर अपयश आले तर पालकांकडून आपल्याच पाल्याला पाठिंबा देण्याऐवजी टोमणे दिले जातात. त्यामुळे मुलांमध्ये नैराश्‍य पसरते आहे. ताणतणाव वाढतो आहे.

पालकांनी आपल्या पाल्याची क्षमता ओळखून त्या दृष्टिकोनातून करिअर निवडावे. एकदा अपयश आले तर परत प्रोत्साहन दिले तर पाल्य पुन्हा यश मिळवू शकतो. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधला तर मुले नैराश्‍याच्या गर्तेत जाणार नाहीत याची काळजी पालकांनीच घ्यायची आहे.

"अपयश हे तात्पुरते असते. ते यशात बदलता येऊ शकते. त्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. पालकांनी सुसंवाद साधावा आणि चर्चा करावी. जेणेकरून मुले तणावात येणार नाहीत. पालकांनी आपल्या मुलांना चांगला माणूस घडविण्यासाठी प्रयत्न करावा. तसे होत नाही म्हणून मुले पालकांच्याच अतिअपेक्षांच्या ओझ्याखाली दबले जातात आणि सुंदर आयुष्याचा हक्क गमावून बसतात." - डॉ. नीलेश जेजुरकर, मानसोपचार तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय

Students Mental Health
Mental Health : कोणी कोणाचं नसतं हेच खरं; डिप्रेशनमधून बाहेर पडायला स्वत:ला अशी करा मदत!  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.