आफ्रिकेतील प्रवासी पॉझिटिव्ह; नाशिकमध्ये ओमिक्रॉनची भीती

रिपोर्ट तपासणीसाठी प्रयोगशाळेत
ओमिक्रॉन व्हेरिएंट
ओमिक्रॉन व्हेरिएंटsakal
Updated on

नाशिक : शहरात काही दिवसांपूर्वी पश्चिम आफ्रिकेच्या माली देशातून व्यवसायानिमित्त आलेला नागरिक कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) आढळून आला असून, जिनोम सिक्वेन्सिंगसाठी संबंधित व्यक्तीचा स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे पाठविण्यात आला आहे. ओमिक्रॉन विषाणू शरीरात आढळून आल्यास या विषाणूची बाधा झालेला शहरातील पहिला रुग्ण असेल. त्यानंतर शहरातील सर्वच व्यवहारांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने ओमिक्रॉनची दहशत नाशिकच्या वेशीवर पोचल्याचे मानले जात आहे.

एप्रिल २०२० मध्ये शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण गोविंदनगर भागात आढळून आला होता. त्यानंतर पहिल्या, दुसऱ्या अशा कोरोना संसर्गाच्या लाटेचे उल्लेख केले गेले. आता तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात असताना कोरोनाचे ३२ म्युटंट झालेल्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोना विषाणूचे आगमन झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वांत महाप्रलयकारी ठरलेल्या डेल्टापेक्षा ओमिक्रॉन अधिक वेगाने पसरतो. देशात आतापर्यंत पन्नासच्या आसपास रुग्ण आहेत. महाराष्ट्रात डोंबिवली भागात पहिला रुग्ण आढळला. राज्यभरात ओमिक्रॉनचे २० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यभरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

ओमिक्रॉन व्हेरिएंट
नाशिक : डिसेंबरमध्ये तिसऱ्यांदा पन्नासहून अधिक पॉझिटिव्‍ह

नाशिक शहरात हायरिस्कमधील सात देशांमधून आलेल्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. विमानतळावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यादी येते. त्यानंतर शहरात महापालिकेतर्फे तपासणी केली जाते. पश्चिम आफ्रिकेतील माली या देशातून मुंबई विमानतळावर एका व्यक्तीचे शनिवारी (ता. ११) आगमन झाले. त्यानंतर रविवारी (ता. १२) संबंधित व्यक्ती नाशिक शहरात पोचली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संबंधित व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ती व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर नाशिक रोडच्या नवीन बिटको रुग्णालयात अलगीकरणात ठेवण्यात आले. या व्यक्तीला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू परिषदेकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. दरम्यान, मागील पंधरवड्यात शहरात परदेशातून ६७४ नागरिक दाखल झाले असून, त्यातील २५३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यातील माली देशातील नागरिक वगळता २५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.

ओमिक्रॉन व्हेरिएंट
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणखी 3 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

हॉटेलचे बारा कर्मचारी क्वारंटाइन

माली देशातून आलेल्या व्यक्तीसोबत दोघांचा समावेश होता. त्यांचे स्वॅब मात्र निगेटिव्ह आले; परंतु बाधित व्यक्ती ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होती त्या हॉटेलमधील १२ कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, माली देशातून परतलेली व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून, मास्क, सॅनिटायझरचा वापर व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वैद्यकीय यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

"हॉटेल हाय फाइव्हमध्ये विदेशातील चार जणांनी सोमवारी दुपारी तीनला रूम बुक केली होती. त्यांपैकी तीन जणांची खासगी रुग्णालयात कोरोना तपासणी करण्यात आली. त्यांपैकी एक जण पॉझिटिव्ह निघाला. त्यास महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे."

-प्रीती त्रिभुवन, व्यवस्थापक, हॉटेल हाय फाइव्ह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.