Crime : 2 आठवडे उलटूनही चांदी लुटीचा लागेना सुगावा

Theft latest crime news
Theft latest crime newsesakal
Updated on

नाशिक : मेळा बसस्थानक रस्त्यावरील किशोर सुधारालयासमोर २५ किलो चांदीची लुट करून पसार झालेल्या गुन्हेगारांचा कोणताही सुगावा अद्याप शहर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या घटनेला दोन आठवड्याचा कालावधी उलटला आहे. परंतु, अद्यापही पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे हाती न लागल्याने पोलिसांच्या कामकाजावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला आहे. (after 2 weeks there is no clue of silver robbery Nashik Crime Latest Marathi News)

मेळा बसस्थानकाकडून ठक्कर बाजार बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील किशोर सुधारालयासमोर २१ ऑगला रात्री साडेअकराच्या सुमारास दोन दुचाकीवरून आलेल्या पाच संशयितांनी चांदीचे पार्सल घेऊन जाणाऱ्या कुरिअर कर्मचाऱ्यांना लुटले. तब्बल २५ किलो चांदी आणि कुरिअर कर्मचाऱ्यांचीच मोपेड दुचाकीवरून संशयित पसार झाले होते.

याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अमितसिंग धनसिंग सिकरवार (२४, रा. फावडे लेन, मुळ रा. उत्तर प्रदेश) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या घटनेला दोन आठवडे उलटूनही गुन्हेगारांचा कोणताही सुगावा शहर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांकडून यासंदर्भात कसून तपास सुरू असल्याचे सांगितले जात असले तरीही अद्यापपर्यंत गुन्ह्याची उकल होऊ शकलेली नाही.

Theft latest crime news
Dinesh Kumar Bagul Bribe Case : पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ

त्यामुळे पोलिसांच्या कामकाजावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, गेल्यावर्षी सातपूरमधील उद्योजकाच्या बंगल्यावर भरदिवसा घरफोडीची घटना घडली होती. त्या गुन्ह्याचाही अद्यापपर्यंत उकल होऊ शकलेली नाही.

"चांदी लुट प्रकरणात अद्यापपर्यंत कोणालाही अटक केलेली नाही. त्यासंदर्भातील तपास व पडताळणी सुरू आहे. समांतर तपास गुन्हे शाखाही करीत आहेत. लवकरच गुन्ह्याची उकल होईल." - साजन सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सरकारवाडा पोलिस ठाणे.

Theft latest crime news
‘MVP’च्‍या सरचिटणीसपदाची सूत्रे ॲड. ठाकरेंच्‍या हाती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.