Nashik News : कोरोनाच्या महामारीनंतर कसबे सुकेणे व पंचक्रोशीतील गावांना लपरीचे दर्शन अखेर चार वर्षांनंतर झाले. यामुळे कसबे सुकेणेकरांनी समाधान व्यक्त केले.
कसबे सुकेणे व परिसरासाठी नाशिकहून ओझर व दिक्षीमार्गे बसबरोबरच सिद्धपिंप्रीमार्गे बससेवा सुरू झाल्याने गावासाठी दुग्ध शर्करा योगच पाहावयास मिळाला. (After 4 years Kasbe Sukenekar saw msrtc Bus service started via sayyad pimpri along with Ozar Dikshi Nashik News)
ओझर व दिक्षीमार्गे बससेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भारती पवार, आमदार दिलीप बनकर यांच्याबरोबरच ओझर ते कसबे सुकेणेपर्यंतच्या गावांचे सरपंच, सदस्यांनी प्रयत्न केले. यामुळे कसबे सुकेणेकरांना लालपरीचे दर्शन झाले.
सिद्धपिंप्रीमार्गे खेरवाडी, ओणे, मौजे सुकेणे व कसबे सुकेणे या मार्गावरूनही आता लालपरीचे फेरे सुरू झाले.
नाशिकचे आमदार राहुल ढिकले, पिंप्रीचे सरपंच भाऊसाहेब ढिकले, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकरराव ढिकले आदींनी प्रयत्न केल्याने नाशिकमार्गे कसबे सुकेणेकडे येणाऱ्या बसची संख्या वाढण्यास मदत झाली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
विद्यार्थी व महिलांनी या बससेवेचेही जोरदार स्वागत केले. ओझर व दिक्षीमार्गे पहिली लालपरी कसबे सुकेणे येथे आल्यानंतर मौजे सुकेणे कनिष्ठ महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. राजेंद्र धनवटे, प्रा. दिनकर रसाळ, देविदास मोरे व ग्रामस्थांनी बसचालक व महिला वाहकाचा सत्कार करण्यात आला.
"गेल्या तीन ते चार वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळाची लालपरी कसबे सुकेणे व पंचक्रोशीतील विद्यार्थी, चाकरमाने, महिला व प्रवाशांसाठी दुर्मिळ झाली होती. आता नियमितपणे लालपरी सुरू होत असल्याने ज्या लोकप्रतिनिधींसह इतरांनी यासाठी प्रयत्न केले, त्या सर्वांना मी धन्यवाद देते." - अनुपमा जाधव, उपसरपंच, कसबे सुकेणे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.