तब्बल ५५ दिवसांनंतर जिल्ह्यात २ हजारांपेक्षा कमी कोरोनाबाधित

एक हजार ८३५ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असून, दुसरीकडे दोन हजार ८८३ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली.
corona
corona Google
Updated on

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने पकड घट्ट केलेली असताना नव्‍याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. तब्‍बल ५५ दिवसांनंतर सोमवारी (ता. १०) जिल्ह्यात दोन हजारांपेक्षा कमी कोरोनाबाधित आढळून आले. यात एक हजार ८३५ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असून, दुसरीकडे दोन हजार ८८३ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. ३२ बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत एक हजार ८० ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात ३२ हजार ९५ बाधित उपचार घेत आहेत. (After 55 days less than 2 thousand corona positive patients found in the district)

सोमवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील ९७३, नाशिक ग्रामीणमधील ८१८, मालेगाव महापालिका क्षेत्रातील २५, तर जिल्‍हाबाहेरील १९ रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला. यापूर्वी गेल्‍या १६ मार्चला एक हजार ३५४ कोरोनाबाधित आढळून आले होते. त्‍यानंतर दरदिवशी आढळणाऱ्या बाधितांची संख्या दोन हजारांपेक्षा अधिक राहिली. दरम्‍यान, बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील एक हजार ८०१, नाशिक ग्रामीणमधील ९२२, मालेगाव महापालिका क्षेत्रातील १११, तर जिल्‍हाबाहेरील ४९ रुग्‍णांचा समावेश आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पाच हजार ६८४ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. यापैकी नाशिक ग्रामीणमधील तीन हजार ९९०, नाशिक शहरातील एक हजार ४८७, तर मालेगावच्या २०७ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात दोन हजार ८८३ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील दोन हजार ६२१ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात आठ, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात पाच रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये २०४, तर मालेगाव मनपा क्षेत्रातील ४५ रुग्‍णांचा संशयितांमध्ये समावेश आहे.

corona
नाशिकमध्ये १० दिवस कडकडीत लॉकडाऊन; पाहा व्हिडिओ

आठवड्याभरानंतर बळींची संख्या चाळीसच्‍या आत

गेल्‍या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झालेली होती. सोमवारी ३२ बाधितांचा मृत्‍यू झाला असून, आठवड्याभरानंतर कोरोनाबळींची संख्या चाळीसपेक्षा कमी राहिली. यापूर्वी गेल्‍या ३ मेस जिल्ह्यात ३२ बाधितांचा मृत्‍यू झाला होता. दरम्‍यान, सोमवारी नाशिक शहरातील सात, तर नाशिक ग्रामीणमधील २५ बाधितांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात येवला व निफाड तालुक्यांतील प्रत्‍येकी पाच बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. बागलाण, कळवण तालुक्‍यांतून प्रत्‍येकी तीन, तर त्र्यंबकेश्‍वर, देवळा तालुक्‍यांतील प्रत्‍येकी दोन बाधितांचा कोरोनाने मृत्‍यू झाला. नांदगाव, सिन्नर, इगतपुरी, मालेगाव ग्रामीण व चांदवड तालुक्‍यांतील प्रत्‍येकी एकाचा मृतांमध्ये समावेश आहे.

corona
नाशिक शहर-जिल्ह्यात कडक लॉकडाउन; जाणून घ्या लॉकडाउनची नियमावली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.