Nashik News : विंचूर महसूल मंडळांतर्गत गोंदेगाव (ता. निफाड) येथील सजाला पूर्णवेळ तलाठी मिळावा, या मागणीस प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांनी हिरवा कंदील दाखवत. राहुल आहिरे यांची येथे नियुक्ती केली आहे. (After 6 years full time Talathi in Gondegaon Nashik News)
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
सहा वर्षांनंतर गोंदेगाव सजाला पूर्णवेळ तलाठी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. २०१७ मध्ये एन. के. कमोदकर यांच्यानंतर निमगाव वाकडा येथील तलाठी प्रदीप तांबे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता. नंतर तो काढण्यात आला अन २०१८ मध्ये गणेश जगताप यांच्याकडे देण्यात आला होता.
तेव्हापासून ते आजतागायत जगताप हे अतिरिक्त तलाठी म्हणून कामकाज बघत होते. ते आठवड्यातील दोनच दिवस उपस्थित असत. गोंदेगाव सजेअंतर्गत २५०० हेक्टर जमीन येत असून गोळेगाव, मरळगोई खुर्द आणि मरळगोई बुद्रुक ही चार गावे देखील आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत असे, ती आता दूर झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.