नाशिक : पंचवटीतील गणेशवाडीसह टकलेनगर, जुना आडगाव नाका भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे महिलांची पाणी मिळविण्यासाठी कसरत सुरू आहे. (After contaminated water women are now suffering from low pressure water supply nashik Latest marathi news)
पंचवटीतील गणेशवाडी, टकलेनगर, हिरावाडी रोड, सहजीवननगर भागात गेल्या कित्येक दिवसांपासून गटारीच्या दूषित पाण्याचा पुरवठा सुरू होता. याबाबत ‘सकाळ’ने वारंवार पाठपुरावा केल्यावर गेल्या तीन- चार दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा बंद झालेला आहे.
मात्र, आता महिला कमी दाबाच्या पाणी पुरवठ्याने त्रस्त आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून अतिशय कमी दाबाचा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे महिलांना मिळेल तेथून पाणी मिळवावे लागत आहे.
गणेशवाडी हा भाग उंचसखल असल्याने काही भागात पूर्ण क्षमेतेने, तर काही भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. काही ठिकाणी तर करंगळी एवढीच धार असल्याने हंडाभर पाण्यासाठी तासभर ताटकळत बसावे लागते, अशी माहिती महिलांनी दिली.
अनेक ठिकाणी घरातील नळाला पाणीच येत नसल्याने सार्वजनिक ठिकाणाहून पाणी आणावे लागत असल्याचे काहींनी सांगितले. याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, लुंगे मंगल कार्यालयाजवळ तिसऱ्या टाकीचे काम प्रगतिपथावर आहे. तेथून पाणीपुरवठा सुरू झाल्यावर नळाला पूर्ण दाबाने पाणी येईल, अशी माहिती देण्यात आली.
"गणेशवाडी हा कष्टकरी वर्गाचा परिसर आहे. या ठिकाणी गत अनेक दिवसांपासून अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे." - संगीता सूर्यवंशी, रहिवासी, गणेशवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.