Nashik Grapes Crisis: 20 लाखांचे कर्ज फेडायचे कसे? नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचा सवाल

tensed farmer due to grapes crisis
tensed farmer due to grapes crisisesakal
Updated on

Nashik Grapes Crisis: द्राक्षाचे पीक चांगले यावे, यासाठी कृषी तज्ज्ञाची नेमणूक केली होती. चार एकरच्या बागेत द्राक्षांचे पीक एकदम जोमदार आले होते. मात्र, अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने संपूर्ण स्वप्नांचा चुराडा झाला आहे.

द्राक्षबाग उपटून फेकण्यासाठी ३० ते ४० हजार रुपये कुठून आणायचे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. जिल्हा बँकेचे सोसायटीचे १६ लाखांचे कर्ज, उधारित आणलेले औषध, खतांचे चार ते साडेचार लाखांचे, असे एकूण २० लाख रुपयांचे कर्ज आहे. (after damaged grapes farmers question on loan pay nashik news )

तुम्ही सांगा भाऊ कुठून पैसे आणू? चार एकर द्राक्ष बागेसाठी १० लाखांहून अधिक खर्च केले. संपूर्ण खर्च वाया गेल्याने कर्ज कसे फेडावे? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असे मोठे प्रश्न आता उभा राहिले आहेत, असे प्रश्‍न वेळापूर येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी राजू पालवे यांनी हंबरडा फोडत उपस्थित केले.

"आठ एकरावर सुधाकर वाणाचे द्राक्षांचे पिक घेतले आहे. आतापर्यंत १२ लाखांच्या जवळपास खर्च केला आहे. ३० ते ४० लाख रुपये उत्पादन हाती आले असते. मात्र, गारपीट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने संपूर्ण द्राक्ष बागेचे नुकसान झाले. शासनाकडून नुकसानभरपाई २० ते २५ हजार रुपये मिळते. त्यातून औषधांचाही खर्च निघत नाही. त्यामुळे शासनाने एकरी दोन ते तीन लाख रुपये नुकसानभरपाई दिल्यास खर्च भरून निघेल." -भिमराज काळे, द्राक्ष उत्पादक, श्रीरामगगर

tensed farmer due to grapes crisis
Grapes Season: जानेवारीत मिळणार द्राक्षांचा गोडवा; निर्यातीचा टक्का वाढण्याची शक्यता

"द्राक्ष बागायतदार संघटनेने कव्हर क्रॉपची शासनाकडे मागणी केली होती. ती मागणी फक्त शंभर हेक्टरएवढीच दिली आहे. कमीत कमी एक हजार हेक्टर प्रायोगिक तत्त्वावर शासनाने द्यावी. गेल्या वर्षी द्राक्ष बागेचा विमा काढला होता. तो द्यावा, तसेच इतर पिकांना एक रुपयांत विमा दिला जातो, तसेच द्राक्ष पिकाला एक हजार रुपयात द्यावा. नुकसानीचे पंचनामे त्वरित करून द्राक्षबागायतदारांना एकरी दोन लाख रुपये नुकसानभरपाई देऊन दिलासा द्यावा." -कैलास भोसले, उपाध्यक्ष, राज्य द्राक्ष बागातदार संघ

"निफाड तालुक्यातील बहुतांश द्राक्षबागा गारपिटीमुळे बाधित झाल्या आहेत. ३० ते २५ गावांना सर्वाधिक हानी झाली आहे. ५० ते ६० गावांना कमी प्रमाणात हानी झाली आहे. शासकीय मदतीपासून कोणी वंचित राहणार नाहील याची काळजी घेत आहोत." -शरद घोरपडे, तहसीलदार, निफाड

tensed farmer due to grapes crisis
Grapes Crisis: द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ; मजुरांची टंचाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.