Nashik: गोदावरीपाठोपाठ आता आहिल्येच्या पात्रात बांधकाम

Construction is currently underway for a bridge across the river
Construction is currently underway for a bridge across the riveresakal
Updated on

नाशिक : गोदावरीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वरला गाडले असताना आता पाठोपाठ अहिल्या नदीपात्रात पुलासाठी बांधकाम करण्‍याचे काम सुरू असल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे नदीपात्रात बांधकामास हरित लवादाच्या आदेशान्वये बंदी असतानाही हे बांधकाम होत असल्याची तक्रार आहे. या प्रकरणी स्थानिक पर्यावरणप्रेमी आणि श्री पंचायती आखाडा नया उदासीन यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी तातडीने सायंकाळी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसह संबंधितांची बैठक घेत चौकशी सुरू केली आहे. (After Godavari river construction is now in Ahilya river Nashik Latest Marathi News)

नदीपात्रालगतची बांधकाम सुरू असलेली जागा आखाड्याची असून, ती धरणासाठी दिली होती. त्यावर परस्पर बांधकाम होत असल्याचा आरोप श्री पंचायती आखाडा नया उदासीन आखाड्याने केला आहे. महंत गोपालदास यांनी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेला याविषयी अर्ज देत आक्षेप नोंदविला आहे. त्यात ज्या जागेवर विकासकामे सुरू आहेत, त्यावर हरकत आहे. संबंधित जागा आखाड्याची असून, ती धरणासाठी दिलेली असताना त्यावर पूल उभारून बांधकामासाठी परवानगी देण्यापूर्वी चुकीच्या पद्धतीने परवानगी मिळविली असल्याचा आरोप केला आहे. पालिकेने मात्र नदीपात्रात बांधकाम नव्हे, तर पूल उभारला जात असल्याचा दावा केला आहे.

आता आहिल्येत अतिक्रमण

त्र्यंबकेश्वर शहरात गोदावरीपात्रावर काँक्रिट टाकून रस्ता उभारला आहे. त्याविषयी बऱ्याच तक्रारी होऊन राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रारी झाल्या. पाठोपाठ आता दुसऱ्या अहिल्या नदीच्या पात्रात बांधकाम सुरू असल्याचा प्रकार पुढे आला आहे. यात नदीपात्रात बांधकामाला शासकीय यंत्रणेकडून कशी परवानगी दिली गेली, असा मुद्दा पुढे आला आहे. हरित लवादाची नदीपात्रात बांधकामाला परवानगी नसताना सुरू असलेल्या बांधकामामुळे हरित लवादाच्या आदेशांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमी ललिता शिंदे यांनी केली आहे.

रिसॉर्ट अन् फार्म हाउससाठी...

ज्या जागांवर हे काम सुरू आहे, ती जागा एका आखाड्याची आहे. भविष्यात बांधकाम विकसित करण्यापूर्वी सध्या पूल उभारण्यासाठी राजकीय दबावातून हे काम रेटले जात असल्याची चर्चा आहे. काही स्थानिक नेत्यांच्या रिसॉर्ट आणि फार्म हाउससाठी सरकारी पैशातून आधीपासूनच रस्ता तयार करण्याचा हा सगळा खटाटोप असल्याचा आरोप आहे. त्यासाठी आखाड्याच्या जागेवर अतिक्रमण करून नगर परिषदेच्या खर्चाने नदीपात्रात घुसून बांधकाम करण्याच्या या सगळ्या खटाटोपात राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश असताना बांधकामाला कशी परवानगी दिली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Construction is currently underway for a bridge across the river
Bus Fire Accident : अपघातग्रस्त चौफुलीवर Zebra पट्टे, Speed Breaker

"नदीपात्रातील बांधकामाबाबत संबंधित नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन माहिती घेणार आहे. कोणत्या अधिकारात नगर परिषदेचे काम सुरू आहे. परवानगी वगैरे सगळी माहिती घेऊन त्यानुसार कार्यवाही केली जाईल."- गंगाथरन डी., जिल्हाधिकारी, नाशिक

"अहिल्या नदीवरील पुलाचे बांधकाम पालिकेच्या हद्दीत सुरू आहे. त्या रस्त्याची जागा नया उदासीन आखाड्याची असली तरी तो वहिवाटीचा रस्ता आहे. तसेच नदीपात्रात बांधकाम नव्हे, तर पूल उभारला जाणार आहे. तसेच त्यासाठी यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी व निधी दिला. पालिकेतील सभेतील निर्णयानुसार कालिका मंदिराकडे जाण्यासाठी पालिकेकडून रस्त्याचे काम सुरू आहे."- रवींद्र जाधव, मुख्याधिकारी, त्र्यंबकेश्वर पालिका

"कागदोपत्री दिशाभूल करून बांधकाम परवानगी मिळविल्याचा संशय आहे. त्यामुळे कोणत्या आधारावर परवानगी दिली, याची चौकशी करावी ही आखाड्याची मागणी आहे. श्री पंचायती आखाडा नया उदासीन आखाड्यातर्फे याविरोधात दाद मागितली जाईल. उद्या विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत."

- महंत गोपाळदास, श्री पंचायती आखाडा नया उदासीन

"त्र्यंबकेश्वरला नद्यांचे उगमस्थान असलेले डोंगर फोडून आणि नदीपात्रात सिमेंट ओतून पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. मात्र, यात राष्ट्रीय हरित लवादाने आदेश देत प्रतिबंध केला असताना नदीपात्रात बांधकामाला कशी परवानगी दिली, हा प्रश्न आहे. या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहे."

- ललिता शिंदे, माजी नगरसेविका तथा याचिकाकर्त्या

Construction is currently underway for a bridge across the river
Smart City Companyकडून पुन्हा एकदा 2 Cycle track बनवण्याचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.