Nashik News : तालुक्यातील पाडळदे शिवारात उंटाना घेऊन जाणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले होते. पोलिसांनी या कारवाईत ५८ उंट जप्त केले होते. या प्रकरणी तालुका पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. (After inspection of 53 camels it was decided to return rajasthan nashik news )
जप्त केलेले उंट निळगव्हाण येथील गो शाळेत ठेवण्यात आले होते. स्थानिक वातावरणाचा त्रास होत असल्याने उंट दगावत होते. अखेर जप्त केलेल्या ५३ उंटांची तपासणीनंतर घरवापसी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्यात वेगवेगळ्या तीन कारवायांमध्ये उंट जप्त करण्यात आले. हे उंट नेमके कशासाठी आणण्यात आले. कत्तलीचा हेतू होता की काय यासह वेगवेगळ्या चर्चांना उधान आले होते. येथील निळगव्हाण गो शाळेतील उंटांची पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांनी तपासणी करत त्यांच्यावर उपचार केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
श्री. खाटीक यांच्या सल्ल्यानंतर तज्ज्ञांशी चर्चा करुन येथे असलेल्या उंटांना राजस्थान येथील रायता या संस्थेकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
रविवारी (ता. २१) सायंकाळी पाचच्या सुमारास चार मोठे उंट व एक लहान बछडे सोडून ५३ उंटांची रवानगी करण्यात आली. रायता येथील भलाराम देवासी, भिकाराम देवासी हे दोघे उंट राजस्थानकडे घेऊन निघाले आहेत. तत्पूर्वी श्री. खाटीक यांनी ५३ उंटांना कानात टॅग (बिल्ला) लावून दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.