Kavnai Fort Video: इर्शाळवाडीनंतर इगतपुरीतील कावनई किल्ल्याचा भाग धसला! जीवितहानी नाही

किल्ल्याचा भाग कोसळल्यानंतर मोठा आवाज ऐकू आल्यानं परीसरात घबराट पसरली होती.
Kavnai Fort Video: इर्शाळवाडीनंतर इगतपुरीतील कावनई किल्ल्याचा भाग धसला! जीवितहानी नाही
Updated on

नाशिक : रायगडमधील इर्शाळवाडी इथं दोन दिवसांपूर्वी दरड दुर्घटनेत संपूर्ण गाव गाडलं गेलं. यामध्ये २० जणांना जीव गमवावा लागला. ही घटना ताजी असतानचं नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील कावनई किल्ल्याचा काही भाग पावसामुळं धसल्याची घटना घडली आहे. पण यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. (After Irshalwadi incident now a part of Kavnai Fort in Igatpuri collapsed No casualties reported)

Kavnai Fort Video: इर्शाळवाडीनंतर इगतपुरीतील कावनई किल्ल्याचा भाग धसला! जीवितहानी नाही
Video: मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले अन् चिखलात फसले! पुण्यातील ज्येष्ठ नागरिकावर ओढवला बिकट प्रसंग

सुत्रांच्या माहितीनुसार, कावनई किल्ल्यावरील मंदिराच्या मागच्या बाजूच्या तटबंदीचा काही भाग कोसळला. सततच्या पावसामुळं ही घटना घडली आहे. हे घडत असताना मोठा आवाज झाला माती वेगानं खाली जात असताना मोठ्या प्रमाणावर धुळ पहायला मिळाली. (Marathi Tajya Batmya)

अचानक झालेल्या या घटनेमुळं काही काळ परिसरात घबराट पसरली होती. या परिसरात मनुष्यवस्ती नसल्यामुळं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. केवळ शेतीचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. (Latest Marathi News)

Kavnai Fort Video: इर्शाळवाडीनंतर इगतपुरीतील कावनई किल्ल्याचा भाग धसला! जीवितहानी नाही
BJP on SC : भाजपची सुप्रीम कोर्टावर टीका! मणिपूर घटनेवरुन केंद्राची खरडपट्टी काढल्यानं आमदाराचा संताप

इर्शाळवाडीत २० जणांचा मृत्यू

दरम्यान, घाटमाथ्यावर सध्या जोरदार पाऊस सुरु असल्यानं दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. दोन दिवसांपूर्वी इर्शाळवाडी गावावर डोंगराचा काही भाग कोसळल्यानं जवळपास संपूर्ण गावच यामध्ये गाडलं गेलं आहे. यात २० जणांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरफ, एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाला यश आलं आहे.

Kavnai Fort Video: इर्शाळवाडीनंतर इगतपुरीतील कावनई किल्ल्याचा भाग धसला! जीवितहानी नाही
Manipur Violence: बंदुकीचा धाकानं विवस्त्र नाचायला भाग पाडलं! 'कारगिल'वीराच्या पत्नीची व्यथा

माळीण, तळीये घडली होती दुर्घटना

यापूर्वी पुणे जिल्ह्यातील माळीण आणि रायगडच्या महाड येथील तळीये ही गावं देखील अशाच प्रकारे डोंगर कोसळल्यामुळं गाडली गेली होती. यापार्श्वभूमीवर राज्य सरकार अशा घटना घडू नये म्हणून धोकादायक स्थितीतील गावांना स्थलांतरीत करण्याची मोहिम राबवण्यावर काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.