Nashik News : पुनर्लागवडनंतर वटवृक्ष वर्षभरात झाला हिरवागार!

banayan tree
banayan treeesakal
Updated on

Nashik News : मालेगाव येथील मोसम पूल भागात महिला व बाल रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यासाठी २५ वर्षाचा वटवृक्ष अडथळा ठरत असल्याने तो वृक्ष हटविण्यात आला. वटवृक्षाला वाचविण्यासाठी मनपाचे लोकप्रतिनिधी, अधिकारी व वृक्षप्रेमी यांची धडपड करत त्याची दुसरीकडे पुनर्लागवड केली होती. (After planting banyan tree turn green within year nashik news)

आज (ता.१४) या लागवडीला एक वर्ष पूर्ण झाले असून वर्षभरात ३५ फूट उंच , विशाल वटवृक्ष पूर्णपणे हिरवागार झाला आहे. झाडाला सर्व बाजूंनी डेरेदार फांद्या फुटत असून हिरव्या पानांनी वृक्ष नटू लागला आहे.

मोसम पूल भागात महिला व बाल रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यासाठी मागील वर्षी या ठिकाणी असलेला २५ वर्षाचा वटवृक्ष काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा वटवृक्ष वाचावा म्हणून मनपा लोकप्रतिनिधी, अधिकारी व वृक्षप्रेमी यांनी हा वटवृक्षाचे दुसरीकडे लागवड करण्याचा निर्धार केला.

त्यानुसार झाडाच्या पुनर्लागवडीसाठी बडोदरा येथील बालाजी एंटरप्राइजेस या कंपनीचे सहकार्य लाभले. पुनर्लागवडीसाठी वटवृक्षाच्या पारंब्या व फांद्या छाटण्यात आल्या. झाडाच्या मुळ्यांना धक्का न लागता त्यांच्यावर जैव औषधांची फवारणी करून मुळ्या कापडाने गुंडाळून १७ टन क्षमतेची क्रेन मालेगाव कॅम्प येथील एकात्मता जॉगिंग पार्कच्या नैऋत्य दिशेला व मसागा महाविद्यालयाच्या आग्नेय कोपऱ्यावर निश्चित केलेल्या जागेवर सहा तासाच्या अथक प्रयत्नाने वटवृक्षाची यशस्वी पुनर्लागवड करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

banayan tree
MBBS Exam : खुशखबर! एम.बी.बी.एस. 4 ऐवजी पाचव्यांदा परीक्षा देऊन उत्तीर्णतेची संधी उपलब्ध

आज (ता.१४) या पुनर्लागवडीसाठी एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. या एक वर्षात हा वटवृक्ष पूर्णपणे हिरवागार झाला आहे. झाडाला सर्व बाजूंनी डेरेदार फांद्या फुटत असून हिरव्या पानांनी वृक्ष नटू लागला आहे.

या वटवृक्षाला जीवदान देण्यासाठी पालकमंत्री दाद भुसे, महापौर ताहेरा शेख, उपमहापौर नीलेश आहेर, आयुक्त भालचंद्र गोसावी, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, लेखाधिकारी राजू खैरनार, उद्यान अधीक्षक नीलेश पाटील, वृक्षमित्र कलीम युसुफ अब्दुल्ला, जतीन कापडणीस, भरत देवरे या सर्वांचे योगदान लाभले आहे.

banayan tree
Nashik News : चटकदार लोणच्याला महागाईची फोडणी...! ग्रामीण भागात लोणचं तयार करण्याची लगबग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.