नाशिक / सटाणा : बागलाण तालुक्यातून पुणे येथे 84 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चार एसटी बस सोमवारी (ता. 10) ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने मोठ्या आशेने नोंदणी केलेल्या प्रवाशांचा हिरमोड झाला. दरम्यान, गुजरातमधून महाराष्ट्रात 12 मजूर घेऊन नवापूर आगारातील एक एसटी बस रविवारी मध्यरात्री सटाण्यात दाखल झाली आहे. या सर्व मजुरांना ग्रामीण रुग्णालयात नेत तपासणी केली.
असे घडले सर्व
शनिवारी (ता. 9) सकाळी पहिली बस सटाणा आगारातून पुण्याला रवाना होईल, अशी घोषणा करीत एसटी बसचे सॅनिटायझेशनदेखील केले होते. मात्र ऐनवेळी पुणे येथील शिवाजीनगर बसस्थानक व सटाणा येथील बसस्थानक कंटेन्मेंट झोनमध्ये येत असल्याने पुण्याला जाणाऱ्या बस रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. याबाबत सटाणा आगार व्यवस्थापक उमेश बिरारी यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल होते. परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी सोमवारी सटाणा आगारातून 35 एसटी बस चालकांसह सज्ज करण्यात आल्या होत्या. मात्र नाशिक येथून आदेश न मिळाल्याने या मजुरांचा भ्रमनिरास झाला आहे.
तीन दिवसांत सुमारे 84 प्रवाशांची नोंदणी
सटाणा आगारातून परराज्याच्या सीमेपर्यंत मजुरांना विनामूल्य सोडण्यासाठी 35 एसटी बस सज्ज आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउनमध्ये अडकलेल्या शहर व तालुक्यातील अनेक नागरिकांना पुणे येथे परतण्याची ओढ लागल्याने प्रवाशांनी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, तहसीलदारांकडून ई-पास, तसेच आगाराने आकारलेले भाडे देण्याचे हमीपत्र दिल्यानंतर बसची नोंदणी करण्यात आली होती. गेल्या तीन दिवसांत सुमारे 84 प्रवाशांनी नोंदणी केली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.