नाशिक : कोरोना संसर्गाचा (corona virus) वेग वाढत असताना प्रथम ऑक्सिजन बेडची (oxygen bed) कमतरता, नंतर रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी (remdesevir injection) नागरिकांना वणवण फिरण्याची वेळ आली. या संकटांवर मात होत नाही तोच आता ॲम्फोटेरिसिन (amphotericin) या इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ( after Remedivisvir now rush for amphotericin)
पोस्ट कोविड उपचारासाठी रुग्ण दाखल
कोरोनाबाधित रुग्ण उपचारअंती बरा झाल्यानंतर आता म्युकरमायकोसिस या नव्या आजाराचा सामना करत आहे. शहरातील बहुतांशी रुग्णालयांमध्ये आता पोस्ट कोविड उपचारासाठी रुग्ण दाखल होत आहेत. या उपचारासाठी ॲम्फोटेरिसिन या महत्त्वपूर्ण इंजेक्शनची आवश्यकता भासत आहे. मेडिकलमध्ये ॲम्फोटेरिसिन इंजेक्शन विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना शासकीय यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत आहे. शहरांमध्ये या इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना पुन्हा एकदा मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ॲम्फोटेरिसिन इंजेक्शन मिळण्यासाठी शासनाने टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. महापालिका हद्दीत वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण भागात जिल्हा रुग्णालयाकडे रुग्णालयांनी मागणी नोंदविल्यानंतर त्यानुसार इंजेक्शनचे वाटप केले जाते. महापालिकेकडे ऑनलाइन पद्धतीने आज मोठ्या प्रमाणात मागणी नोंदविण्यात आली. परंतु इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना परत फिरावे लागले. बुधवारी (ता. १९) सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे इंजेक्शन उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले. मात्र अद्यापही इंजेक्शन कधी मिळतील याबाबत स्पष्टता नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
अपुऱ्या माहितीमुळे गोंधळात भर
महापालिकेने ऑनलाइन पद्धतीने रुग्णालयांनी नोंदणी करावी, असे आदेशित केले आहे. परंतु मंगळवारी महापालिका मुख्यालयात डॉक्टरांच्या चिठ्ठीवर ॲम्फोटेरिसिन इंजेक्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जमली. परंतु महापालिकेकडे साठा नसल्याने हात वर करण्यात आले. इंजेक्शन कधी मिळेल, इंजेक्शन मिळविण्याची पद्धत काय, याबाबत रुग्णांच्या नातेवाइकांना माहिती नसल्याने मोठा गोंधळ उडाला. चार ते पाच तास मुख्यालयाबाहेर प्रतीक्षा करूनही नागरिकांना इंजेक्शनबाबत माहिती मिळाली नाही. दुसरीकडे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या नातेवाइकांना आत येऊ न दिल्याने मानसिक त्रासात अधिक भर पडली. बुधवारी सायंकाळपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे इंजेक्शन उपलब्ध होतील, अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांना काढता पाय घ्यावा लागला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.