वणी (जि. नाशिक) : तालुक्यातील ननाशी परिसरात दुपारी चार च्या सुमारास पुन्हा भूकंपाचा (Earthquake) 2.4 रिकटर स्केलचा सौम्य धक्का बसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. 14 मे रोजी या परिसरात असेच धक्के जाणवले होते. (again mild earthquake hit in nanashi area of Nashik district)
मेरी (Maharashtra Engineering Research Institute) संस्थेत सदर भूकंपाची नोंद झाली असून नाशिक पासून 40 किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू असून दुपारी 4: 12 मिनिटांनी 2.4 रिकटर स्केलचा धक्का बसल्याची माहिती तहसीलदार पंकज पवार यांनी दिली आहे.पेठ - दिंडोरी - सुरगाणा- कळवण तालुक्याचे सीमावर्ती भागातील घाटमाथा परिसरात वारंवार भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आजही धक्का जाणवताच नागरिकांने घराबाहेर पळ काढला .परिसरात एकमेकांना फोन करत माहिती घेतली.
(again mild earthquake hit in nanashi area of Nashik district)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.