Onion Rate : रस्त्यावर कांदे फेकत शेतकऱ्यांचा रास्तारोको

onion farmer
onion farmeresakal
Updated on

मनमाड (जि. नाशिक) : केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कांद्याच्या भावात सतत घसरण होत असल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शनिवारी

(ता. ११) संतप्त शेतकऱ्यांनी (Farmer) मोर्चा काढत मनमाड-चांदवड राष्ट्रीय महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको आंदोलन केले. (against continuous decline in onion prices Angry farmers staged protests Agricultural Produce Market Committee nashik news)

यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे फेकत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत संताप व्यक्त केला.

कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शनिवारी (ता.११) बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर संतप्त झालेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत चांदवड- मनमाड महामार्गाकडे जाऊन रस्त्यावर कांदे फेकत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत संताप व्यक्त केला.

महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या कांदा पिकास अत्यंत तुटपुंजा भाव मिळत आहे. यामुळे उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्यांचा निघत नाही. अशी परिस्थिती असतानाही राज्य व केंद्र सरकार मात्र याकडे दुलर्क्ष करत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क भरमसाठ वाढले आहे. याचाही परिणाम कांदा दरावर होत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

onion farmer
Nashik News : बागलाण तालुक्यातील विकास कामांसाठी 22 कोटी 77 लाख रुपयांचा निधी मंजूर

यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकास तीन हजार रुपये हमीभाव मिळावा, नारपारच्या डीपीआरमध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश करावा, वन व गायरान जमीन करणाऱ्याच्या नावे करावी, ओला दुष्काळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा रक्कम त्वरित द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी विजय दराडे, त्र्यंबक ठाकरे, शांताराम दळवी, नवनाथ दळवी, सोमनाथ पवार, शिवाजी गोसावी, गोरख फोडसे, संतोष बेदाडे,तुकाराम पिंपळे, तात्यासाहेब पानसरे, विष्णू गायकवाड, शांताराम लोखंडे, पंढरीनाथ पवार, रामभाऊ पिंपळे, कमळाबाई ठाकरे, शालिनी ठाकरे, द्वारकाबाई तांबे, भिकूबाई मोरे आदींनी आंदोलन केले.

onion farmer
Devendra Fadnavis : मी यांच्या बापालाही घाबरत नाही; फडणवीसांची जीभ घसरली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.