Market Committee Election : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला!

MLA Manikrao Kokate,
Former MLA Rajabhau Waje,
Youth leader Uday Sangle
MLA Manikrao Kokate, Former MLA Rajabhau Waje, Youth leader Uday Sangleesakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यात सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची समजली जाणारी तसेच वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या बऱ्याच तपानंतर अखेर बिगुल वाजला. (Agricultural Income Market Committee election finally will starting soon nashik news)

तालुक्यात यापूर्वीच खरेदी विक्री सहकारी संघ समितीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या दोन्ही संस्थाच्या निवडणुकीने तालुक्यातील सहकार क्षेत्रात कमालीची रंगत निर्माण झाली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे.

बाजार समितीवर आपले वर्चस्व स्थापन होऊन सहकार क्षेत्राची कमान हातामध्ये राहण्यासाठी राजकीय पक्षांचे मुत्सद्दी राजकीय डावपेच आखण्यात मग्न असल्याचे चित्र आहे.सोमवारपासून (दि.२७) नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार असून २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती आजघडीला जिल्ह्यात अग्रणी समजली जात आहे. वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या बाजार समितीचा तालुक्यात पसारा आहे. बाजार समितीवर अधिपत्य वर्चस्व राहण्यासाठी तालुकास्तरीय राजकीय पुढारी सक्रिय झाले आहेत

सहकार क्षेत्रात तालुक्यातील कोकाटे व वाजे , सांगळे या दोन्ही गटात राजकरण तापले असून आरोप प्रत्यारोप याच्या फैरी निवडणूक लागल्यावर होणार असून दोन्ही गटांत मोर्चेबांधणी सुरु झाली आहेत.

नवखे चेहऱ्यांची हालचाल

सहकार क्षेत्रातील मान, प्रतिष्ठा आपल्याही वाटयाला यावी म्हणून राजकारणातील नवखे चेहरे पुढे येण्यासाठी राजकीय डावपेच आखताना दिसत आहे. तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे नेते मंडळी मात्र बाजार समितीचे राजवैभव मिळवि- ण्यासाठी आतापासून सक्रिय झाल्याचे त्यांच्या राजकीय हालचालीवरून दिसत आहे.

बाजार समितीच्या १८ संचालकांच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने वातावरण ढवळून निघालेआहेत.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

MLA Manikrao Kokate,
Former MLA Rajabhau Waje,
Youth leader Uday Sangle
Nashik News : मालेगाव आगारातील वाहकाच्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक; हरवलेल्या मुलाला केले आई-वडिलांकडे सुपूर्द

2855 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापारी गट, हमाल मापारी गट, सोसायटी गट, ग्रामपंचायत गट मतदानाच्या हक्क बजावणार आहेत. व्यापारी गटात 171

हमाल मापारी गटात 352

सोसायटी गटात 1267

ग्रामपंचायत गटात 1065असे 2 हजार 855 मतदार मतदानाच्या आपला हक्क बजावणार आहेत.

१८ संचालकांच्या निवडीसाठी होणार मतदान

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक मंडळाच्या निवडीसाठी सोमवारपासून (दि.२७) नामनिर्देशन पत्र कार्यालयीन वेळेत स्वीकारून २८ एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार आहे. संचालक मंडळ असे राहणार सेवा सहकारी संस्था मतदार संघ सर्वसाधारण गटातून ७ संचालकांची निवड केली जाणार आहे.

तसेच संस्था गटातील महिला प्रतिनिधी २ जागा, इतर मागासवर्गीयासाठी २. विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी १ याप्रमाणे सेवा सहकारी मतदार संघातून ११ संचालक निवडले जाणार आहेत.

ग्रामपंचायत मतदार संघातून ४ संचालक निवडले जातील यामध्ये सर्वसाधारण गटातील २, अनुसूचित जाती जमाती गटामधून १, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधून १ संचालक निवडल्या जाईल. अडते व व्यापारी मतदार संघातून २ संचालक, हमाल व माथाडी मतदार संघातून १२ संचालक याप्रमाणे १८ संचालक निवडले जाणार आहेत.

MLA Manikrao Kokate,
Former MLA Rajabhau Waje,
Youth leader Uday Sangle
Nashik Crime News: ऐकाव ते नवलचं! चक्क मोबाईल चोराने दिल नवीन फोन घरी आणून देण्याच आश्वासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.