Abdul Sattar : शेतीच्या नुकसानीबाबत 5 तारखेनंतर निर्णय; कृषिमंत्री अब्दुल सत्तार

Agriculture Minister Abdul Sattar speaking at a press conference held at the Nashik Divisional Commissionerate on Thursday
Agriculture Minister Abdul Sattar speaking at a press conference held at the Nashik Divisional Commissionerate on Thursdayesakal
Updated on

Abdul Sattar : राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसानीच्या घटना तब्बल सातवेळा झाल्या, आताही आणखी दोन- तीन दिवस अवकाळी पावसाच्या शक्यता आहेत, त्यामुळे येत्या ५ तारखेपर्यतच्या नुकसानीचा अंदाज घेऊन अंतिम आकडेवारीनंतर नुकसानीच्या मदतीचा निर्णय होईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. (Agriculture Minister Abdul Sattar statement Decision after 5th on farm loss nashik news)

उत्तर महाराष्ट्र कृषी आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. मंत्री सत्तार म्हणाले की, खरीप आढावा घेतला. त्यात खत बियाणे वेळेत मिळावीत निष्कृष्ट बियाणे येणार नाही, आल्यास विना जामीन कारवाई व्हावी, अशा सूचना दिल्या आहेत.

यंदाही ड्रोनद्वारे नॅनो युरिया पुरवण्याचा प्रयोग राबविला जाईल. याशिवाय कांदा साठवून ठेवण्याची क्षमता वाढविण्यासाठी उपाय आणि ठिबक सिंचन किमान सातवर्षे खराब होणार नाही, अशी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Agriculture Minister Abdul Sattar speaking at a press conference held at the Nashik Divisional Commissionerate on Thursday
Nashik: नवीन प्रशासकीय इमारतीच्या वाढीव बांधकामाचा प्रस्ताव; ZP बांधकाम विभागाकडून प्रस्ताव शासनाकडे सादर

अचूक अंदाजासाठी पर्जन्यमापक

राज्यात पाऊस आणि हवामानाच्या अचूक अंदाजासाठी १० हजार पर्जन्यमान आणि हवामानाचा अंदाज देणारे यंत्र बसविले जाणार आहे. त्यात, नाशिक जिल्ह्यातील ४१३ मंडळात ३५० पर्जन्यमापक केंद्रात नवीन १७८३ नवीन यंत्रासाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे.

बीड येथे कृषी अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा निषेध करीत त्यांनी माझी सगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की

पुढाऱ्यांनो अधिकाऱ्यांना वेठीस धरू नका कृषी आयुक्तपासून तर कृषी कर्मचाऱ्यांपर्यंत कुणावरही हल्ला झाल्यास त्यांना संरक्षण देणे माझे कर्तव्य आहे. मग कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो त्याच्यावर कारवाई होणार असेही मंत्री सत्तार यांनी स्पष्ट केले.

Agriculture Minister Abdul Sattar speaking at a press conference held at the Nashik Divisional Commissionerate on Thursday
Finance Commission Fund: विकास व पायाभूत सुविधांसाठीच वित्त आयोगाचा निधी; ग्रामविकास विभागाने केले स्पष्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.