Nashik Agriculture News : राज्यात 60 हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट; 177 कोटींचा निधी खर्च

tree
treeesakal
Updated on

Nashik Agriculture News : राज्यात गेल्यावर्षी ‘मनरेगा’तंर्गत ६० हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. त्यासाठी ९३ हजार ९०२ शेतकऱ्यांचे अर्ज दाखल झाले होते. कृषी विभागातर्फे ६८ हजार ३४८ हेक्टरला तांत्रिक, ६५ हजार ४२१ हेक्टरला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

प्रत्यक्षात ४० हजार २२९ हेक्टरवर खड्डे खोदण्यात आले आणि उद्दिष्टाच्या ६६ टक्के म्हणजे, ३९ हजार ८४२ हेक्टरवर फळबाग लागवड झाली. यंदा पुन्हा फलोत्पादन संचालकांनी राज्यातील ६० हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट्य निश्‍चित करत लागवडीसाठीचे वेळापत्रक दिले आहे. (Aim to plant orchards on 60 thousand hectares in state 177 crores outlay of funds Nashik Agriculture News)

गेल्यावर्षीच्या फळबाग लागवडीसाठी अकुशल करिता १४६ कोटी ४५ लाख १० हजार, कुशलसाठी ३० कोटी ९२ लाख ६८ हजार असे एकूण १७७ कोटी ३७ लाख ७८ हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे.

गेल्यावर्षी योजनेतून १९ हजार ३४८ हेक्टर २९ आर वर आंब्याची, ४ हजार ३२३ हेक्टर ६४ आर वर संत्र्याची, ३ हजार ४५९ हेक्टर ७२ आर वर काजूची, २ हजार ८५६ हेक्टर ९ आर वर मोसंबीची, १ हजार ५९७ हेक्टर ९० आर वर नारळाची,

१ हजार ८९० हेक्टर १४ आर वर सीताफळाची, तर १ हजार ३८४ हेक्टर ६५ आर वर डाळिंबाची लागवड करण्यात आली. योजनेत लागवड केलेल्या फळझाडे, वृक्षांपैकी बागायत क्षेत्रात ९० टक्के आणि कोरडवाहू क्षेत्रापैकी ७५ टक्के झाडे जिवंत ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान दिले जाते.

०.०५ ते २ हेक्टर मर्यादेत फळझाडांची लागवड करता येते. आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर कलमे, ड्रॅगन फ्रूट, ॲव्हॅकेडो, केळी, सुपारी, साग, गिरीपुष्प,

कडुनिंब, सिंधी, शेवगा, हादगा, बांबू, जेट्रोफा, कढीपत्ता, पानपिंपरी, करंज, इतर औषधी वनस्पतींच्या जोडीला गुलाब, मोगरा, निशिगंध, सोनचाफा, लवंग, दालचिनी, जायफळ, गिरीची लागवड करता येते, अशी माहिती फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी दिली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

tree
Gram Sevak Award : 5 वर्षांपासून रखडलेल्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे सोमवारी वितरण

गोंदिया जिल्ह्यात २२३ टक्के लागवड

नागपूर विभागात ११०, अमरावती विभागात ९५.३७ टक्के फळबाग लागवड गेल्यावर्षी उद्दिष्टाच्या तुलनेत झाली आहे. दुर्गम भागातील गोंदिया जिल्ह्यात फळबाग लागवडीची टक्केवारी उद्दिष्टाच्या तुलनेत २२३ टक्के राहिली.

ठाणे, पालघर, रायगड, पुणे, जालना, लातूर, परभणी, बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात फळबाग लागवडीचे चांगले काम झाले. गावस्तरावरील पेटीत यंदा शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अर्ज टाकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे अर्ज जून-जुलैपर्यंत ग्रामपंचायतीकडून ऑनलाइन जमा केले जातील. जुलै-ऑगस्टमध्ये कलमे, रोपांची रोटवाटिकेपासून शेतापर्यंत वाहतूक करायची आहे. जून ते डिसेंबरमध्ये प्रत्यक्षात लागवड करायची आहे.

दरम्यान, देशात महाराष्ट्राने ‘मनरेगा’तून सलग तीन वर्षे अधिकची फळबाग लागवड केल्याने मुंबईत राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, फलोत्पादन मंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात कृषी आयुक्त सुनील चव्हाण, डॉ. मोते यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

tree
Nashik News: बदल्यांसाठी आदिवासी तालुक्यांतील कर्मचारी एकटविले; ZPकडून सोईचा अर्थ-विभागीय आयुक्तांना पत्र

फळबाग लागवडीचे विभागनिहाय उद्दिष्ट (आकडे हेक्टरमध्ये दर्शवितात)

विभागाचे नाव २०२२-२३ मधील लागवड २०२३-२४ मध्ये उद्दिष्ट

ठाणे ८६८९.९८ १४ हजार

नाशिक ६२१०.५३ १० हजार

पुणे ५८६७.२६ ८ हजार ७००

कोल्हापूर १०६१.४० ३ हजार ४००

औरंगाबाद २४१२.५५

३ हजार ३००

लातूर ३२५८.१० ४ हजार ९००

अमरावती ६८२८.२६ ८ हजार २००

नागपूर ५५१४.१३ ७ हजार ५००

tree
Kharif Season : खरीप हंगामासाठी 1 लाख क्विंटल बियाण्यांची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.