Bribe Case : कँट्समध्ये Majorसह Garrison Engineerला लाच घेताना अटक

Bribe crime
Bribe crimeesakal
Updated on

नाशिक : येथील गांधीनगरच्या हवाई दलाच्या कँट्समध्ये लाच प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) कारवाई करीत मेजरसह गॅरिसन इंजिनिअरला गुरुवारी (ता.१३) सायंकाळी लाच घेताना रंगेहाथ अटक केली. (Air force Garrison Engineer along with Major arrested while taking bribe Nashik Nashik Crime News)

Bribe crime
Nashik : BLO शिक्षक अन् अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी; नोटिसा दिल्योन वाद

हिमांशू मिश्रा असे संशयित लाचखोर मेजरचे तर मिलिंद वाडिले असे ज्युनिअर गॅरिसन इंजिनिअरचे नाव आहे. नाशिक-पुणे रोडवर लष्कराच्या हवाई प्रशिक्षणाचे केंद्र (कॅट) असून याठिकाणी लष्करी हेलिकॉप्टर चालविण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. कॅटमधील मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये कार्यरत मेजर हिमांशू मिश्रा आणि मिलिंद वाडिले हे एका कामासाठी कंत्राटदाराकडून लाच मागत असल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती.

त्यानंतर पोलिस निरीक्षक रणजित पांडे यांच्यासह पथकाने सापळा रचला. या सापळ्यात हे दोघे लाच घेताना रंगेहाथ सापडले. कारवाईत सहायक गॅरिसन अभियंता तथा मेजर दर्जाचा अधिकारीच सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच, ही लाच किती रुपयांची होती, कशासाठी घेतली जात होती, यासह अन्य बाबी उघड झालेल्या नाहीत. सीबीआयचे पथक अद्याप कॅटच्या आवारातच असून दोघांसह अन्य बाबींची कसून चौकशी सुरू आहे.

Bribe crime
Bus Fire Accident : अपघातग्रस्त चौफुलीवर Zebra पट्टे, Speed Breaker

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.