नाशिक : राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणजे जुनीचं कॅसेट आहे. सुर्य मावळल्यानंतर संध्याकाळी ते सभा घेतात जाहीर सभांमध्ये त्यांना शाहु, फुले, आंबेडकरांचे नाव घ्यायला लाज वाटते. सध्या त्यांचे राज्यात जातीय तेढ वाढविण्याचे काम सुरु आहे. परंतू सरकार म्हणून जातीय सलोखा राखण्याचे काम आम्ही करतं असून बाबासाहेबांच्या संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी पार पाडतोय. तुम्ही टेन्शन घेवू नका, त्यांना सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. कायदा हातात घेणाऱ्यांची काय अवस्था होते हे आपण राणा दाम्पत्याच्या आजच्या स्थितीवरून पाहतोचं आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी महागाई, इंधन दरवाढ या प्रश्नांकडे लक्ष देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.
राज ठाकरे सुपारीबहाद्दर - उपमुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) भवन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मार्गदर्शन करताना दोघांनी राज ठाकरे यांच्या निषेधाच्या ठरावाच्या मागणीला उत्तर देताना आवाहन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज ठाकरेंच्या सभेला महत्व नाही. नाशिककरांना त्यांचा स्वभाव चांगलेच माहित आहे. राज ठाकरे हे सुपारीबहाद्दर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वर जाहीर सभांमधून ते टिका करतं आहेत. परंतू त्यांना पवार काय आहे हे चांगलेचं माहित आहे. राज ठाकरे यांनीचं अनेकदा शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न हाणून पाडू. सध्या महागाईचा प्रश्न महत्वाच आहे. या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी त्यांनी जाणीवपुर्वक शक्तीस्थळांवर हल्ला करून प्रचार व प्रसार करण्याचे काम सुरु आहे. राज ठाकरे यांच्यात खरोखरचं दम असता तर नाशिककरांनी त्यांच्या पक्षाचे तीन आमदार पुन्हा निवडून दिले असते असा सवाल करतं पवार यांनी राज ठाकरेंची नक्कल केली. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. पगार यांनी जिल्हा परिषदेत एक हाती सत्ता आणण्याचा दावा केला.
चांदवडला अधिक निधीची कबुली
भाजपचा (BJP) आमदार असलेल्या चांदवड विधानसभा मतदारसंघात ८० कोटी रुपयांचा निधी खर्च झाल्याची कबुली तक्रारीवर देताना महसुल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) तसेच आमदार सुधीर तांबे यांच्या निधीतून कामे झाल्याची माहिती दिली. पीक कर्जा बाबत तातडीने निर्णय घेण्याचे सांगताना नाबार्ड कडून जिल्हा बॅंकांना निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आमदारांनी सुचविलेली कामे करावीचं लागतात असे उत्तर पदाधिकाऱ्यांना न विचारता मंत्रालयातून परस्पर कामे होत असल्याची तक्रारीवर दिले.
राज ठाकरेंना किंमत नको- भुजबळ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यात जातीय तणाव निर्माण करतं आहे. महागाई सारखे मुद्दे असताना त्याकडे लक्ष जावू नये यासाठी जातीय मुद्दे घेवून ते मैदानात उतरले आहेत. परंतू त्यांना मोठे करण्याची आवश्यकता नाही. त्यांचे काय आहे ते आम्ही बघू परंतू वातावरण बिघडविण्याचे काम सुरु आहे. त्यावर जनप्रबोधन करण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थासंदर्भातील निकाल चार मे रोजी काय लागेल तो लागेल परंतू राज्य निवडणुक आयोगाने पावसाळ्यात निवडणुका घेता येणार नसल्याचे राज्य सरकारला कळविले असल्याने कार्यकर्त्यांनी निवडणुका लांबण्याची मानसिकता ठेवावी, निवडणुकांमध्ये सर्वांना बरोबर घेऊन निर्णय घेऊ. आमदारकी टिकविण्याचे काम करावे, मतभेद मिटवावे, जुने- नवे एकत्र घेऊन काम करावे, पदांमध्ये बदल करण्याची आवश्यकता नसल्याचे ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, ॲड माणिक कोकाटे, सरोज आहिरे, नितीन पवार, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड, माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, माजी आमदार दीपिका चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.