Ajit Pawar: अजित पवार गट आक्रमक, नाशकातील NCPचे कार्यालय घेतले ताब्यात, शरद पवारांच्या समर्थकांना बाहेर काढलं

Ajit Pawar
Ajit Pawar
Updated on

Ajit Pawar: नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये वादाला तोंड फुटले. शहरातील मुंबई नाका परिसरातील राष्ट्रवादी भवन कार्यालयासमोर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले असून दोन्ही गटाकडून मोठी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. त्याचबरोबर परिसरात गोंधळाचे वातावरण असून पोलिसांकडून गोंधळ बाजूला करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. 

अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ यांनी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात मोठा वाद निर्माण झाला आहे. याचा परिणाम आज सकाळपासूनच दिसून येत आहे. दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी भवन कार्यालयावर ताबा सांगितलं जात होता. सकाळी आजच्या पवार गटाच्या नेत्यांकडून कार्यालयावर ताबाही घेण्यात आला. 

दुपारी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून बैठक होणार होती. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार गटाचे नेते जमत होते. मात्र त्यापूर्वीच भुजबळ गटाचे समर्थक कार्यालयात उपस्थित होते. अखेर आता मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली असून गोंधळाचे वातावरण आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar: "परवानगीशिवाय माझा फोटो वापरु नयेत अन्यथा..."; शरद पवारांचा अजितदादा गटाला इशारा

दरम्यान दोन्ही गटाकडून घोषणाबाजी करण्यात येत असून शरद पवार गटाच्या समर्थकांना कार्यालयात जाऊ दिले जात नसल्याने वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता कार्यालयाबाहेर गोंधळ सुरु असून नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार देखील उपस्थित आहेत. 

माजी नगरसेवक गजानन शेलार, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड इथे समर्थकांसह उपस्थित आहेत. गजानन शेलार हे शरद पवार यांच्या बाजूनं उभे आहेत. सद्यस्थितीत पोलिसांचा मोठा फौजफाटा असून दंगा नियंत्रण पथक जमावाला बाजूला करत असल्याचे चित्र आहे. (Nashik News Update)

Ajit Pawar
Bjp Politics: राष्ट्रवादीतील सर्जिकल स्ट्राईकनंतर BJPची पहिली चाल, सत्ता नसलेले राज्य ताब्यात घेण्यासाठी मोठे बदल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.