Khelo India Sport : केरळमधील त्रिचूर येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स लीगमध्ये पहिल्याच दिवशी छत्रे विद्यालय व जय भवानी व्यायामशाळेची आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू आकांक्षा व्यवहारे हिने तीन सुवर्णपदके पटकावली. दिव्या उपेंद्र सोनवणे हिने पहिल्याच स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. (Akanksha vyavhare win 3 gold medals Divya sonawane 1 gold medal in Khelo India competition nashik news)
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे हिने ४५ किलो वजनी गटात युथ ज्युनिअर व सीनिअर या तिन्ही वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करीत स्नॅचमध्ये ६२ किलो क्लीन जर्कमध्ये ७३ किलो वजन एकूण १३५ किलो वजन उचलून प्रभावी कामगिरी केली.
छत्रे विद्यालयाच्या दिव्या सोनवणे हिने आपल्या पहिल्याच स्पर्धेत ४० किलो वजनी गटात स्नॅचमध्ये ४८ किलो व क्लीन जर्कमध्ये ५२ किलो असे १०० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले.
वीणाताई आहेर हिने ४५ किलो ज्युनिअर्समध्ये ५७ किलो स्नॅच व ७६ किलो क्लीन जर्क १३५ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळविले. पूजा वैष्णव हिने ४९ किलो वजनी गटात ६७ किलो स्नॅच व ८२ किलो क्लीन जर्क असे १४९ किलो वजन उचलून ज्युनिअरमध्ये रौप्यपदक पटकावले. खुशाली गांगुर्डे हिने ४९ किलो सीनिअर्समध्ये सहावा क्रमांक मिळविला.
विजेत्या खेळाडूंना रोख बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. यशस्वी खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी. जी. धारवडकर, अध्यक्ष पी. जे. दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, मुख्याध्यापक आर. एन. थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका संगीता पोतदार, जय भवानी व्यायामशाळेचे मोहन गायकवाड आदींनी शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.