Akhadi Utsav: वावी येथे उद्यापासून आखाडी उत्सव! दशावतारी देवीदेवतांच्या सोंगाचाही लिलाव

आखाडी उत्सवासाठी रोवण्यात आलेली दांडी.
आखाडी उत्सवासाठी रोवण्यात आलेली दांडी.esakal
Updated on

Akhadi Utsav : वावी येथे रविवारी (ता.६) आखाडी उत्सवास (दशावतारी) प्रारंभ होत आहे. त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या उत्सवासाठी ग्रामस्थांकडून विविध देवीदेवतांची सोंगे घेतली जाणार आहेत.

या दशावतारी सोंगाचा नुकताच लिलाव करण्यात आला. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (Akhadi Utsav from tomorrow at Vavi Dashavatari also auction of dress of goddesses nashik)

वावी येथे आखाडी दशावतारी उत्सवास काही वर्षांपासून खंड पडला होता. या दशावतारी (आखाडी) उत्सवाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. ६ ते ११ आॅगस्ट या काळात ग्रामसचिवालयासमोर आखाडी उत्सव भरणार आहे.

पाऊस पडण्यासाठी वरुणराजाला साकडे घातले जाणार आहे. वावी येथील तुकाराम महाराज मंदिरात दशावतारी (आखाडी) उत्सवासाठी देवी-देवतांच्या सोंगाचा लिलाव करण्यात आला.

साई कपिले, बानू ताजणे, गणेश काटे, भास्कार जाधव (गणपती), आनप परिवार (सारजा), प्रवीण वाजे (मच्छ), सुनील गोराणे (वराह), चंद्रकांत पठाडे, रमेश शिंदे व राजेंद्र कुंभार (भीम-बकासूर), बापू काटे (एकादशी),

शंकर काळोखे (रक्तादेवी), रमेश गायकवाड (महादेव), राजेंद्र कांदळकर (वीरभद्र), भाऊराव साळुंके (वेताळ), नवनाथ वैराळ (भैरवनाथ), नितीन ताजणे (नृसिंह), रामेश्वर जाजू (नारदमुनी), गणेश काटे (तीळ संक्रांत),

भारत वेलजाळी (इंद्रजित), नवनाथ गायकवाड (चंद्रसूर्य), दत्तात्रेय पठाडे (मारुती), अर्जुन भोसले (हिडिंबा), विश्वनाथ मोरे (भगवान एकलव्य) यांनी लिलावात विविध देवीदेवतांच्या सोंगाचे लिलाव खरेदी केले. मानाचे गावदेवीचे सोंग शंकर बबनराव राजेभोसले यांनी ३५ हजार ३०० रुपयांना घेतले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आखाडी उत्सवासाठी रोवण्यात आलेली दांडी.
Nashik News: पाणवेलींपासून 8 जीवनोपयोगी वस्तूंची निर्मिती! चांदोरी, सायखेडा येथे ZPचा अभिनव उपक्रम

सहा दिवस चालणाऱ्या या आखाडी उत्सवासाठी पारंपरिक वाद्य असेल. या वाद्यावर देवीदेवतांची सोंगे नाचविली जाणार आहेत. या नृत्यासाठी सोंगे घेणाऱ्यांकडून उत्कृष्ट पद्यन्यास केला जातो.

या उत्सवात ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

बैठकीस सरपंच विजय काटे, माजी सरपंच अशोक ताजणे, विठ्ठल राजेभोसले, गणेश वैराळ, दीपक वेलजाळी, विलास सच्चे, बाळासाहेब गोराणे, कैलास जाजू, अनिकेत काटे, राजेंद्र काटे, चंद्रकांत पठाडे, गणेश वेलजाळी, किशोर आनप, अभिजित मंडलिक, विलास पठाडे, गोरख पवार, योगेश ताजणे, राजेंद्र कांदळकर, गफूर इनामदार, गोपाळ जाजू यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आखाडी उत्सवासाठी रोवण्यात आलेली दांडी.
Nashik Rain Update: भावलीपाठोपाठ भाम धरणही ओव्हेरफ्लो! सलग पाचव्या वर्षी धरण ओसंडून वाहू लागल्याने समाधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.